सप्टेंबरमध्ये होणार मिनी आयपीएल

यावर्षी सप्टेंबरमध्ये आयपीएलसारखीच मिनी आयपीएल स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. 

Updated: Jun 24, 2016, 10:37 PM IST
सप्टेंबरमध्ये होणार मिनी आयपीएल  title=

मुंबई : यावर्षी सप्टेंबरमध्ये आयपीएलसारखीच मिनी आयपीएल स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. ही मिनी आयपीएल परदेशामध्ये होणार आहे. अमेरिका किंवा युएई यापैकी एका ठिकाणी ही स्पर्धा खेळवली जाऊ शकते, अशी माहिती मिळत आहे. 

आयपीएलमध्ये खेळणाऱ्या आठही टीम या स्पर्धेमध्ये खेळतील, तसंच फक्त दहा ते पंधरा दिवसांचीच ही स्पर्धा असेल असं अनुराग ठाकूर म्हणाले आहेत. चॅम्पियन्स लीग ही टी 20 स्पर्धा रद्द केल्यानंतर वर्षातून आणखी एक आयपीएल घेण्याचा बीसीसीआयचा विचार होता. आयपीएलमधल्या काही टीम मालकांनीही अशी स्पर्धा भरवण्याची मागणी बीसीसीआयकडे केली होती.