५०० धावा करूनही न्यूझीलंडचा पराभव

जलद गोलंदाज स्टु्अर्ट ब्रॉड आणि बेन स्टोक्सच्या ३-३ विकेटच्या जोरावर इंग्लंडनं न्यूझीलंडला १२४ धावांनी पराभूत केलं आहे. इंग्लंडनं न्यूझीलंडसमोर ३४५ धावांच लक्ष ठेवलं होतं. आपल्या गोलंदाजाच्या आक्रमक गोलंदाजीवर न्यूझीलंडला २२० धावांत ऑल आऊट केलं.

Updated: May 26, 2015, 12:49 PM IST
५०० धावा करूनही न्यूझीलंडचा पराभव title=

लंडन: जलद गोलंदाज स्टु्अर्ट ब्रॉड आणि बेन स्टोक्सच्या ३-३ विकेटच्या जोरावर इंग्लंडनं न्यूझीलंडला १२४ धावांनी पराभूत केलं आहे. इंग्लंडनं न्यूझीलंडसमोर ३४५ धावांच लक्ष ठेवलं होतं. आपल्या गोलंदाजाच्या आक्रमक गोलंदाजीवर न्यूझीलंडला २२० धावांत ऑल आऊट केलं.

न्यूझीलंडने पहिल्या डावात ५२३ आणि दुसऱ्या डावात २२० धावा केल्या. याचबरोबर इंग्लंडनं दोन मॅचच्या टेस्ट सीरिजमध्ये १-० अशी आघाडी मिळवली आहे. 

टेस्ट इतिहासातील ही १४वी वेळ आहे, ज्यावेळी एखादी टीम ५०० धावा बनवून देखील पराभूत झालीय. न्यूझीलंडनं पहिल्या डावात ५२३ धावा केल्या होत्या. बी. जे. वाटलिंग (५९) आणि कोरी अॅंडरसन(६७) यांनी अर्धशतकीय खेळी केली, मात्र टीमला पराभवापासून वाचवू शकले नाही. ब्रॉडनं ५० धावा देत तीन विकेट घेतल्या, तर स्टोक्सने ३८ धावा देत तीन विकेट घेतल्या. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.