टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा अखेर रद्द

टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा रद्द झाला आहे. सामन्याचं प्रक्षेपण हक्काचा वाद न मिटल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.  झिम्बाब्वेतील क्रिकेट प्रक्षेपणाचे हक्क टेन स्पोर्टसकडे आहेत. बीसीसीआय आणि टेन स्पोर्टस यांच्यातील संघर्षामुळे, अखेर टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Updated: Jun 22, 2015, 06:41 PM IST
टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा अखेर रद्द  title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा रद्द झाला आहे. सामन्याचं प्रक्षेपण हक्काचा वाद न मिटल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.  झिम्बाब्वेतील क्रिकेट प्रक्षेपणाचे हक्क टेन स्पोर्टसकडे आहेत. बीसीसीआय आणि टेन स्पोर्टस यांच्यातील संघर्षामुळे, अखेर टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा १० जुलैला सुरू होणार होता. या दौऱ्यात तीन एकदिवसीय तसेच दोन ट्‌वेंटी-२० लढतींचा समावेश होता. या मालिकेच्या प्रक्षेपणाबाबत टेन स्पोर्टस आणि बीसीसीआमध्ये तडजोड करण्यासाठी झिम्बाब्वे मंडळ प्रयत्नशील होते. अखेर प्रक्षेपणाचा वाद न मिटल्याने हा दौरा रद्द करण्यात आला.

झिम्बाब्वे आणि बीसीसीआय यांच्यात अद्याप या दौऱ्याबाबतचा परस्पर समन्वय करारही झालेला नाही. त्यामुळे झिम्बाब्वे क्रिकेट मंडळाने, टीम इंडियाच्या खेळाडूंना व्हिसा देण्याची प्रक्रियाही सुरू केलेली नव्हती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.