विष्णू चाटेसारख्या आरोपीला तुरुंगाचा पर्याय कसा काय दिला जाऊ शकतो?

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला महत्त्वाचा आरोपी विष्णू चाटेला आता त्यानं मागणी केलेल्या लातूर तुरुंगात हलवण्यात आलं आहे

शिवराज यादव | Updated: Jan 22, 2025, 09:56 PM IST
विष्णू चाटेसारख्या आरोपीला तुरुंगाचा पर्याय कसा काय दिला जाऊ शकतो?  title=

संतोष देशमुख हत्या प्रकरणातला महत्त्वाचा आरोपी विष्णू चाटेला आता बीडऐवजी लातूरच्या तुरुंगात ठेवलं जाणार आहे. चाटेच्या विनंतीनंतर कोर्टानं हा निर्णय दिलाय. मात्र यावरुन आता नवा वाद सुरू झालाय. पाहुयात त्यासंदर्भातला हा रिपोर्ट. 

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला महत्त्वाचा आरोपी विष्णू चाटेला आता त्यानं मागणी केलेल्या लातूर तुरुंगात हलवण्यात आलं आहे. यावरुन आता नवा वाद सुरू झाला आहे. आपल्या बीडऐवजी लातूर तुरुंगात ठेवावं अशी विनंती चाटेनं कोर्टात केली होती. कोर्टानं ती आज मान्य केली. मात्र विष्णू चाटेसारख्या आरोपीला तुरुंगाचा पर्याय कसा काय दिला जाऊ शकतो? असा सवाल उपस्थित करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक आरोप केले आहेत. 

एकीकडे आरोपी वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी दुसरीकडे आरोपी विष्णू चाटेला पसंतीचं तुरुंग दिलं जातं.. यामुळं तपासावर प्रभाव पडत असल्याचा आरोप दमानियांनी केला आहे. त्यामुळं सर्व आरोपींची चौकशी, सुनावणी मुंबईत व्हावी तसंच त्यांना मुंबईच्याच तुरुंगात कोठडीत ठेवलं जावं तरच योग्य रितीनं तपास होईल असं दमानियांनी मत मांडलं आहे.

43 दिवसापासून देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. अशात एकाच दिवशी पीडितांऐवजी आरोपींना दिलासा देणारे निर्णय आल्यानं देशमुख प्रकरणात न्यायाची प्रतीक्षा करणाऱ्या प्रत्येकाचा हिरमोड झालाय. आरोपींना दिलासा मिळेल असे निर्णय होऊ लागल्यानं पीडीत देशमुख कुटुंबात अस्वस्थतेची भावना वाढीस लागलीये.