www.24taas.com , झी मीडिया, पुणे
कात्रज-कोंढवा मार्गावर पिण्याच्या पाण्यावरून झालेल्या भांडणातून एका रखवालदाराने दुसर्याक रखवालदाराचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास खून केल्यानंतर घटनास्थळाजवळच शांत बसलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
अनिल फुलचंद पांडे (२६, रा. उत्तर प्रदेश) याच्या डोक्यात घाव घालून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी राजकुमार त्रिलोकीनाथ दुबे (४३, रा. फतेपूर, उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. नीलेश ज्ञानेश्वदर गायकवाड (२८, रा. कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी दिलेल्या फिर्याद दिली आहे.
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील शिव एसकेडी या साईटवर दोघे रखवालदारीचे काम करीत होते. तेथेच दोघेही दोन पत्र्याच्या खोल्यांमध्ये राहत होते. पांडे याने दुबेचे पिण्याचे पाणी संपवले व ते पुन्हा भरून ठेवले नाही म्हणून त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर पांडे त्याच्या खोलीत झोपायला गेला. पांडे झोपलेला असताना दुबे याने तेथे जाऊन तेथील लोखंडी पहारीने त्याच्यावर वार केले. त्यानंतर पांडेला जवळच्या काळुबाई मंदिरासमोर ओढत आणले. हा प्रकार पाहून तेथे गेलेल्या गायकवाड यांच्या अंगावर त्याने मोठा दगड उचलून मारला. पांडे रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यानंतर गायकवाड याने पोलिसांना कळवले. पोलिसांनी तेथेच बसलेल्या दुबेला अटक केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.