www.24taas.com, त्र्यंबकेश्वर
पवित्र नगरी त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथांच्या यात्रेमुळे गजबजून गेलंय. गावोगावच्या दिंड्या त्र्यंबकेश्वरात दाखल झाल्यायत. या सोहळ्याला किमान पाच लाख भाविक हजेरी लावण्याचा अंदाज आहे.
पौष वैद्य एकादशी.... म्हणजेच शटतिला एकादशी..1219 साली याच दिवशी ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वीरात समाधी घेतली. राज्यभरातून लाखो वारक-यांच्या सहाशे दिंड्या निवृत्तीनाथांच्या समाधीस्थळी दाखल झाल्यायत. पहाटे पारंपारिक पूजेनंतर लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात आली. या यात्रेसाठी पाच लाख भाविक येण्याचा अंदाज आहे.
विठुरायाच्या गजरामध्ये आता तीन दिवस वारकरी पंथाचा कुंभमेळा चालणारा आहे. मात्र वाढत्या गर्दीमुळे पंढरपूर, आळंदीप्रमाणे विशेष निधी आणि यंत्रणा तैनात करण्याची मागणी होत आहे. ब्रम्हगिरीसह त्र्यंबकेश्वराचा परिसर टाळ मृदुंगाच्या गजरानं आणि विठू नामाच्या आवर्तनांनी भारिन गेलाय. आता तीन दिवस असाच जयघोष सुरू राहणार आहे.