'शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर कर्जमाफी उपाय नाही'

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विधानसभेत स्पष्ट केलंय. कर्जमाफी हा शेतक-यांच्या आत्महत्येवर रामबाण उपाय नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. 

Updated: Mar 17, 2016, 07:10 PM IST
'शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर कर्जमाफी उपाय नाही' title=

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विधानसभेत स्पष्ट केलंय. कर्जमाफी हा शेतक-यांच्या आत्महत्येवर रामबाण उपाय नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. 

कर्जमाफी केली, तर मत मिळतील मात्र शेतक-यांच्या समस्या सुटणार नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात राज्य सरकारनं केंद्र सरकारला चुकीची माहिती दिल्याची कबुलीही त्यांनी विधानसभेच्या भाषणात दिली. 

केंद्र सरकारला सुधारीत माहिती पाठवली जाईल अंस मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल येत्या आघाडी सरकारनं काहीच केलं नाही असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

उलट आघाडीच्या काळात हा प्रस्ताव रिजेक्ट करण्यात आला होता असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. शिवाय टेंडर निघाल्यावर ४० महिन्यात स्मारक पूर्ण होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. याच वर्षी ठाणे मेट्रोच्या काम सुरू करणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.