मुंबई : राज्यात मुंबईसह कोकण, नाशिकमध्ये अवेळी पाऊस कोसळला. यामुळे शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. आंबा, द्राक्ष आदी पिकांचे मोठे नुकसान झालेत. पुढील तीन दिवस पुन्हा गारांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागने वर्तविला आहे.
अस्मानी संकटानं कंबरडं मोडलेल्या राज्यातल्या बळीराजासाठी पुन्हा चिंता निर्माण करणारी ही बातमी आहे. पुढील तीन-चार दिवसांत राज्यात गारांसह पावसाचा अंदाज कुलाबा वेध शाळेनं व्यक्त केलाय. भारताच्या दक्षिण किनारपट्टीवरील केरळ आणि श्रीलंकेत कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय. त्यामुळं ७, ८ आणि ९ मार्चला पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागात गारांसह पाऊस होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कुलाबा वेध शाळेच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुत्ते यांनी दिली.
गेल्या आठवड्यात राज्यातल्या काही भागांत अवकाळी पावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसानं केलं. आता गारपीट झाल्यास उरलंसूरलं उत्पन्नही बळीराजाच्या हातातून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतक-यांनी आताच खबरदारीचे उपाय योजण्याचं आवाहनं कुलाबा वेधशाळेनं केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.