कॅम्पाकोलात दुस-या दिवशीही पालिकेची कारवाई

 कॅम्पाकोलामध्ये दुस-या दिवशीही महापालिकेची कारवाई सुरू आहे. काल वीजेची 55, पाण्याचे 3 तर गॅसचे 14 कनेक्शन तोडल्यानंतर आज उर्वरित घरांचे कनेक्शन तोडण्याचं काम सुरू आहे. 

Updated: Jun 24, 2014, 07:03 PM IST
कॅम्पाकोलात दुस-या दिवशीही पालिकेची कारवाई  title=

मुंबई : कॅम्पाकोलामध्ये दुस-या दिवशीही महापालिकेची कारवाई सुरू आहे. काल वीजेची 55, पाण्याचे 3 तर गॅसचे 14 कनेक्शन तोडल्यानंतर आज उर्वरित घरांचे कनेक्शन तोडण्याचं काम सुरू आहे. 

वीज आणि गॅस तोडण्यासाठी चार टीम्स, तर पाणी तोडण्यासाठी सहा टीम कार्यरत आहे. दरम्यान इशा एकता अपार्टमेंटमधील गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या 802 क्रमांकाच्या फ्लॅटमधीलही वीज कनेक्शन तोडलं असून पाणी आणि गॅस कनेक्शन तोडण्याचं काम सुरू आहे.

वरळीमधल्या कॅम्पाकोला इमारतीमधल्या रहिवाशांना पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं धक्का दिला. या बिल्डिंगमध्ये अनधिकृत फ्लॅट्समध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी ३१ मे २०१४ पर्यंत घरं रिकामी करावीत, असे आदेश कोर्टानं दिलेत. त्यानुसार मुंबई पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यासाठी धडक मारली. मात्र, रहिवाशांच्या विरोधामुळे दोनवेळा मुंबई पालिका कर्मचारी रिकाम्या हाताने परत गेलेत. त्यानंतर त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आलेत.

त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट रहिवाशांनी घेतली. यावेळी आमदार बाळा नांदगावकर तसेच अन्य राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर कारवाई करण्यास विरोध करण्यात येणार नाही, असं कॅम्पाकोला रहिवाशांनी सांगितलं. त्यानंतर पालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.