आता तर वरण-भात खाणंही होऊन बसलंय कठिण...

अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका डाळ उत्पादनाला बसलाय. त्यामुळे रोजच्या जेवणाचा अविभाज्य घटक असलेल्या तूरडाळ आणि मूगडाळीच्या भावात कमालीची वाढ झालीय.

Updated: Mar 31, 2015, 03:31 PM IST
आता तर वरण-भात खाणंही होऊन बसलंय कठिण... title=
फाईल फोटो

मुंबई : अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका डाळ उत्पादनाला बसलाय. त्यामुळे रोजच्या जेवणाचा अविभाज्य घटक असलेल्या तूरडाळ आणि मूगडाळीच्या भावात कमालीची वाढ झालीय.

वाशीतील घाऊक बाजारात तूरडाळीचे दर किलोमागे ८८ रुपयांपर्यंत पोहोचल्याने किरकोळ बाजारात या डाळींच्या दराने थेट शंभरी गाठली आहे. उत्तम प्रतीच्या तूरडाळीसाठी किरकोळ बाजारात १०० ते १०५ रुपयांचा दर आकारला जाऊ लागल्याने ग्राहकांची अक्षरश: लूट सुरू आहे. उडीद आणि मूगडाळीचे दरही गेल्या पंधरवडय़ापासून वाढल्याने त्याचाही फटका बसतोय.

अकोला, अमरावती, वर्धा, सोलापूर, जालना, लातूर अशा भागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर तूरडाळीचे उत्पादन घेतलं जातं. मात्र, अवकाळी पावसानं यंदा या पीकांचं मोठं नुकसान केल्यानं डाळीची आवक घटलीय. त्यामुळे ऐन लग्न सराईत सामान्यांना मोठा फटका बसतोय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.