राज ठाकरे सोडणार मौन, मनसे व्यासपीठावर सेनेचे माजी खासदार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल तीन महिन्यांनी मौन सोडणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पक्षाच्या पराभवानंतर आज मुंबईत मनसेचं चिंतन शिबीर होत आहे. पण याबद्दल प्रचंड गुप्तता बाळगण्यात आलीय. दरम्यान, शिवसेनेचे माजी खासदार या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.

Updated: Jan 30, 2015, 11:12 AM IST
राज ठाकरे सोडणार मौन, मनसे व्यासपीठावर सेनेचे माजी खासदार title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल तीन महिन्यांनी मौन सोडणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पक्षाच्या पराभवानंतर आज मुंबईत मनसेचं चिंतन शिबीर होत आहे. पण याबद्दल प्रचंड गुप्तता बाळगण्यात आलीय. दरम्यान, शिवसेनेचे माजी खासदार या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.

शिवसनेचे माजी खासदार भारतकुमार राऊत मनसेच्या व्यासपीठावर दिसणार आहेत. मनसेच्या चिंतन शिबिरात भारतकुमार राऊत मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर मुंबईत मनसेच्या चिंतन शिबिराला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. तब्बल तीन महिन्यांनंतर राज ठाकरे आपलं मौन सोडणार आहेत. पक्षाचं पूननिर्माण आणि पक्षातील शिलेदारांची गळती कशी रोखायची याबद्दल या शिबिरात राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

या शिबिराचं वैशिष्ट्य शिबिराबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आलीये. या शिबिरात पक्षाच्या प्रमुख नेते, शाखाध्यक्ष आणि संलग्न संघटनांच्या प्रमुखांनाच प्रवेश आहे. प्रवेशपत्रावरही ओळख पटवण्यासाठी फोटो आणि बारकोड देण्यात आलाय.आमंत्रितांशिवाय कुणालाही शिबिरात प्रवेश मिळू नये, यासाठी खाजगी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आलीय.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल फोन सोबत आणू नये आणि शिबिरादरम्यान सभागृह परिसराच्या बाहेर जायलाही मनाई करण्यात आलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.