बायको सुखी असेल तर... वेगळं राहण्याअगोदर आरतीसोबत सेहवागची शेवटची पोस्ट

Virender Sehwag Divorce Rumors : भारतीय संघाटा माजी ओपनर वीरेंद्र सेवाग 20 वर्षांनंतर पत्नी आरती अहलावतपासून वेगळा होत आहे. या दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 24, 2025, 12:24 PM IST
बायको सुखी असेल तर... वेगळं राहण्याअगोदर आरतीसोबत सेहवागची शेवटची पोस्ट  title=

भारतीय क्रिकेटर्स गेल्या काही दिवसांपासून आपल्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आले आहेत. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. एवढंच नव्हे तर मनीष पांडे आणि आश्रिता शेट्टी यांनी देखील वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. असं असताना आता वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत यांच्यातही काही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. वीरेंद्रने 20 वर्षांनंतर पत्नी आरतीसोबतचं नातं संपवल्याची चर्चा आहे. 

शेवटची पोस्ट 2023 मध्ये 

वीरेंद्र सेहवागने 2023 मध्ये पत्नी आरतीसाठी सोशल मीडियावर शेवटची पोस्ट केली होती. 28 एप्रिल 2023 रोजी त्यांनी दुबईचा एक फोटो शेअर केला. यामध्ये त्याने कॅप्शनमध्ये लिहिले - जगणे आणि स्वप्न पाहणे याच्यामध्ये कुठेतरी. यासोबत त्याने 'हॅपी वाईफ हॅपी लाईफ' हा हॅशटॅग जोडला होता. या पोस्टला जवळजवळ 21 महिने झाले आहेत. या काळात, सेहवागने गेल्या वर्षी लग्नाच्या वाढदिवसादिवशीही पोस्टही केली नव्हती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virender Sehwag (@virendersehwag)

त्याआधी, वीरेंद्र सेहवाग नियमितपणे त्याच्या पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असे. आरती आणि वीरेंद्र सेहवाग यांनाही दोन मुले आहेत. आर्यवीर 17 वर्षांचा आहे तर वेदांत 14 वर्षांचा आहे. दोघेही सध्या दिल्लीकडून वयोगटातील क्रिकेट खेळतात. अलिकडेच, आर्यवीरने कूचबिहार ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावले होते. त्याने 297 धावांची खेळी खेळली.

आरती अजूनही लावते सेहवागला आडनाव 

वीरेंद्र सेहवाग आणि आरती यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. आरतीचे नाव अजूनही सेहवाग लिहिलेले आहे. वीरेंद्र सेहवाग आणि आरती लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. आरतीच्या मावशीचे लग्न सेहवागच्या कुटुंबात झाले होते. 17 वर्षे एकमेकांना ओळखल्यानंतर दोघांनी लग्न केले. सुरुवातीला वीरूचे कुटुंब लग्नासाठी तयार नव्हते. त्याच्या हट्टीपणापुढे कुटुंबाला झुकावे लागले.