Maharashtra Leader of Opposition Postion: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र राज्यात सरकार स्थापन झालं असली तर अद्याप विरोधी पक्षनेत्याची खुर्ची रिकामीच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात विरोधी पक्ष नेतेपदाचा वेगळा प्रयोग होण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्ष नेता कोण होणार याची सगळीकडे चर्चा असतानाच तीन पक्षांसाठी दिड दिड वर्ष विरोधी पक्ष नेत्याचा फॉर्म्युला ठरवणार असल्याची चर्चा आहे. दिड वर्ष विरोधी पक्ष नेता फॉर्म्युल्याकरता शरद पवार आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे.
शरद पवारांची राष्ट्रवादी जरी दीड वर्षांच्या फॉर्मुल्यासाठी आग्रही असली तरी माहविकास आघाडीत या निर्णयावरुनही मतभेद आहेत. कॉग्रेस मात्र संख्याबळानुसार विधानपरिषदेत कॉग्रेसचा आणि विधानसभेत ठाकरेंचा विरोधी पक्ष नेता असावा याकरता आग्रही आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. दिल्लीत येत्या अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते दिल्लीत भेटणार आहेत. दिल्लीतून विरोधी पक्ष नेते पदाचा निर्णय येत्या अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान होणार आहे.
राज्यात विरोधीपक्ष नेते होण्यासाठी कोणत्याही पक्षाला 10 टक्के जागा मिळवणे अपक्षित असते. 288 पैकी कोणत्याही पक्षाचे किमान 29 आमदार असणे गरजेचे आहे. मात्र आत्ताची परिस्थिती पाहता एकाही घटक पक्षाकडे तितके संख्याबळ नाहीये. एकाही पक्षाला 29 जागा मिळालेल्या नाहीयेत. त्यामुळं राज्यात विरोधी पक्ष नेते पद असणार का याविषयी मतमतांतरे होते.
महाविकास आघाडीला 50 जागांचा आकडाही पार करता आला नाहीये. काँग्रेस 16, उद्धव ठाकरेंना 20 तर, शरद पवारांच्या पक्षाला 10 जागांवर विजय मिळवता आला आहे.
भाजपने 2024 मध्ये 149 जागांवर निवडणूक लढवत तब्बल 132 जागांवर विजय मिळवला आहे. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याचबरोबर, शिंदेसेनेला 57 जागा आणि अजित पवारांच्या पक्षाला 41 जागांवर विजय मिळवला आहे.