Science News : अंतराळ हे विश्वच अनेकांना उमगण्यापलिकडे आहे. आजही असे अनेक सिद्धांत आहेत जिथं अवकाशाशी निगडीक अनेक गोष्टींचा उलगडा झालेला नाही. ग्रहताऱ्यांच्या या विश्वासंदर्भातील अनेक नवनवीन गोष्टी साऱ्यांनाच भारावून सोडताना आता एक नवा उलगडा झाला आहे. जिथं पाण्याशी संबंधित कैक नव्या गोष्टी समोर आल्या आहेत.
जीवसृष्टी आणि पाण्याचं अस्तित्वं असणारा पृथ्वी हा एकमेव ग्रह असून, याच्या जवळ जाणारं लहानसं संशोधनही या क्षेत्रासाठी मोठी क्रांती ठरतं असं म्हणमं गैर ठरणार नाही. अशाच एका निरीक्षणपर अहवालानुसार बिग बँगच्या कोट्यवधी वर्षांनंतरही ब्रह्मांडामध्ये मोठे जलसाठे अस्तित्वात होते.
नव्या सिद्धांतानुसार जेव्हा ब्रह्मांडामध्ये सुरुवातीला काही तारे विशाल सुपरनोवाच्या रुपात स्फोट होऊन समोर आले तेव्हा त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचं उत्सर्जन झालं. हे पाणी पहिल्यांदाच जीवसृष्टीसाठी आवश्यक असणारं वातावरण तयार करण्याचं काम करताना दिसलं.
NASA च्या माहितीनुसार जल अर्थात पाणी हा ब्रह्मांडातील सर्वात जुन्या घटकांपैकी एक आहे. पृथ्वीशिवाय मंगळाच्या पृष्ठासह अंतर्गत भागातही पाण्याचे साठे असल्याचं म्हटलं जात असून, बुध ग्रहाच्या बर्फाळ टोकापाशी, धुमकेतूच्या चहुबाजूंना आणि चंद्राच्या अंतर्गत भागात असणाऱ्या महासागरांमध्येही जलसाठे अस्तित्वात असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नव्हे, तर सूर्यमालेच्या एक्सोप्लॅनेच आणि इतर मिल्की वेच्या इंटरस्टेलर वायूपासून तयार झालेल्या ढगांमध्येही पाण्याचे
एकिकडे हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या एकत्रिकरणानं पाण्याची निर्मिती होत असल्याचा सिद्धांत अस्तित्वात असतानाच दुसरीकडे संशोधकांच्या दाव्यानुसार महाकाय (200 सूर्यांसमान एक तारा) ताऱ्याच्या स्फोटातून ही स्थिती निर्माण होऊन पाण्याची उत्पत्ती होते.
संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार सुपरनोवातून उत्सर्जित झालेल्या हायड्रोजन, ऑक्सिजन आणि इतर घटकांमुळे तयार झालेल्या ढगांच्या केंद्रस्थानी जलसाठा अस्तित्वात होता. हे पाणी इंटरस्टेलरमध्ये असणाऱ्या पाण्याच्या तुलनेत 30 पट अधिक सघन असावं असाही कयास सध्या लावला जात आहे. संशोधकांनी केलेला हा दावा योग्य ठरला तर, ब्रह्मांडामधील जीवसृष्टीची कैक गुपितं उलगडण्यात यामुळं मोठा हातभार लागू शकतो.