गिरगाव मेट्रो, 'आरे'तील झाडांची कत्तल होऊ देणार नाही - राज

 मनसेचा आज मुंबईत नववा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईचा नवा विकास आराखडा आणि मेट्रोचा गिरगावमधील टप्पा यावर सडकून टीका केली. आरे कॉलनीतील झाडांची कत्तल होऊ देणार नाही, असं राज ठाकरेंनी ठणकावलं.

Updated: Mar 9, 2015, 08:46 PM IST
गिरगाव मेट्रो, 'आरे'तील झाडांची कत्तल होऊ देणार नाही - राज title=

मुंबई:  मनसेचा आज मुंबईत नववा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईचा नवा विकास आराखडा आणि मेट्रोचा गिरगावमधील टप्पा यावर सडकून टीका केली. आरे कॉलनीतील झाडांची कत्तल होऊ देणार नाही, असं राज ठाकरेंनी ठणकावलं.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवाबद्दल बोलतांना राज ठाकरे म्हणाले, पराभवाला मी घाबरत नाही... निवडणुकांचा निकाल काहीही लागला तरी काम करत राहणार. शिवाय सतत होणाऱ्या निवडणुकांबद्दल राज ठाकरेंनी सर्व निवडणुका एकत्र घेण्याबाबत सुचवलंय. 

या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी विकास आराखड्यावर सडकून टीका केली. मराठी माणूस राहत असलेल्या आरए, गिरगाव या भागांमधूनच मेट्रोचा मार्ग नेण्यात आला, मलबार हिलसारख्या भागातून मेट्रोचा मार्ग नेण्याची हिंमत दाखवली जाईल असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  सध्या महाराष्ट्र इंच इंच विकू असा नारा दिला जात असून मराठी माणसाच्या रक्षणासाठी कार्यकर्त्यांनी सदैव जागरुक राहावं, दरवेळी माझ्या आदेशाची वाट बघू नये असं त्यांनी सांगितलं. 

मनसेचा आजचा नववा वर्धापन दिन... 

  • ऐका राज ठाकरेंची तोफ दणाणली... 
  • राज ठाकरेंची सोशल मीडियावर टीका... 
  • मराठी भाषा दिन फक्त मनसेनं साजरा केला- राज
  • पराभवाला मी घाबरत नाही- राज ठाकरे
  • सर्व निवडणुका एकत्र घेऊन टाका - राज ठाकरे
  • मुंबईच्या विकास आराखड्यावरून राज ठाकरेंनी डागली तोफ
  • आरे कॉलनी, गिरगाव मेट्रोबाबत टीका
  • मराठी माणसांना मुंबईबाहेर घालवण्याचा प्रयत्न - राज ठाकरे
  • मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवण्याचा वेल डिझाईन प्लान - राज ठाकरे
  • मुंबई हातातून घालवायची आहे का?- राज ठाकरेंचा सवाल
  • महाराष्ट्रात सध्या सुरू आहे इंच इंच विकू - राज ठाकरे
  • मेट्रोचा मुंबईतील विकास, आरेतील झाडांची कत्तल होऊ देणार नाही - राज ठाकरे

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.