मुंबई : आघाडी सरकारच्या काळात मुस्लिमांना दिलेलं आरक्षण रद्द करण्याचा जीआर देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केला आहे. मुस्लिम आरक्षण रद्द करण्याचा जीआर फडणवीस सरकारने काढला आहे.
हा जीआर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाळला आहे. आरक्षण रद्द केल्याच्या विरोधात विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झाले आहेत, हा जीआर विधानभवनासमोर काही आमदारांनी जाळला आहे.
आघाडी सरकारच्या काळात मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्या पैकी मराठा आरक्षण हे कायद्याच्या कचाट्यात सापडलं आहे तर मुस्लिम आरक्षण रददचा जीआर सध्याच्या देवेंद्र फडणवीस सरकारने काढलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.