सुराज्य माझा जन्मसिद्ध हक्क- नरेंद्र मोदी

मुंबई दौऱ्याची सांगता करताना मोदींनी स्वराज्यासोबतच सुराज्य हाही जन्मसिद्ध हक्क आहे असं ठणकावलं. लोकशाहीत केलेल्या चुकांची दुरूस्ती करण्याची संधी मिळते असं सांगत त्यांनी निवडणुकीचा पडघमही वाजवला.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 27, 2013, 11:06 PM IST

www.24taas.com, दिनेश दुखंडेसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई.
मुंबई दौऱ्याची सांगता करताना मोदींनी स्वराज्यासोबतच सुराज्य हाही जन्मसिद्ध हक्क आहे असं ठणकावलं. लोकशाहीत केलेल्या चुकांची दुरूस्ती करण्याची संधी मिळते असं सांगत त्यांनी निवडणुकीचा पडघमही वाजवला.
सरकारचं काम फक्त कर गोळा करणं नसतं याची आठवणही त्यांनी करून देताना सरकार ही गरिबांची आशा आहे असं ठणकावलं. लोकशाहीची व्याप्ती थांबली असल्याची खंत मोदी य़ांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. मुंबई दौ-यात भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत त्यांनी मिशन 2014 ची घोषणा केली होतीच. मोदींच्या संध्याकाळच्या कार्यक्रमाने त्यावर शिक्कामोर्तब केलं.
भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात राज्यातल्या भाजप नेत्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत मोदींनी मिशन २०१४ चा कानमंत्र भाजप नेत्यांना दिला. तर दुसरीकडे मित्रपक्ष शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन ऑल इज वेल असल्याचा संदेश दिला. प्रचारप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मोदींनी नव्या रणनितीचा शुभारंभ महाराष्ट्रातून केलाय.
भाजपच्या प्रचारप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुंबईत पहिल्यांदाच दाखल झालेल्या नरेंद्र मोदींच्या स्वागताला मुंबई आणि प्रदेश भाजपाचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. खरतरं भाजपाचे सध्याचे तारणहार आणि पक्षात पीएमपदाचे प्रबळ दावेदार आणि असलेल्या मोदींचं जोरदार स्वागत करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली होती खरी, मात्र उत्तराखंडच्या प्रलयामुळं स्वागत साधं झालं असलं तरी मोदींच्या दर्शनाला अनेक कार्यकर्ते विमानतळावर आवर्जून उपस्थित होते.
त्यानंतर रंगशारदात झाली प्रदेश भाजपची कोअर कमिटीची बैठक.. या बैठकीला दिल्लीत असलेले भाजपचे माजी पक्षाध्यक्ष नितीन गडकरी वगळता राज्यातील सर्व बडे नेते उपस्थित होते.. जनतेत जा, असा संदेश मोदींनी नेत्यांना या बैठकीत दिला.. काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा आणि सुशासनाचं मार्केटिंग करण्याचा सल्लाच मोदींनी या बैठकीत दिला..
मोदींच्या मुंबई भेटीच्या निमित्तानं राज्यातील 30 पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या `मिशन 2014`ची घोषणा निवडणुकीची जबाबदारी वाहणा-या गोपीनाथ मुंडेंनीही करुन टाकली..
व्हीओ3- उत्तराखंडात मदतीच्या केलेल्या दाव्यानंतर, मोदींना संकुचित न राहण्याचा सल्ला देणारा सामनाचा अग्रलेख आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची सारवासारव.. हे सर्व ताजं असतानाच, मोदी मुंबई भेटीत उद्धव ठाकरेंची भेट घेणार की नाराजी दाखवणार याकडंही अनेकांचं लक्ष होतं..
मात्र बेरजेचं राजकारण करत, नरेंद्र मोदींनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली आणि सगळं काही आलबेल असल्याचा संदेश दिला.. सुमारे 20 मिनिटं झालेल्या या चर्चेमुळं शिवसेनेलाही बळ लाभलं असं म्हटलं, तर वावगं ठरु नये.. तसंच शिवसेना विरुद्ध मोदी या सामन्यावरही या निमित्तानं पडदा पडला.... त्यानंतर मोदींनी उद्योगपतींशीही चर्चा केली. या भेटीत राज्यातल्या भाजप नेत्यांना चार्ज तर केलंच, पण मुंबईचं महत्व पाहता नेत्यांपासून उद्योगपतींपर्यंत भेटीगाठी घेऊन मिशन 2014 च्या रणनीतीची तयारी केली....

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.