Sara Tendulkar : भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आता नवीन जबाबदारीसाठी सज्ज झाली आहे. सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) बुधवारी एक खास पोस्ट करून सारा ही सचिन तेंडुलकर फाउंडेशनची नवी संचालिका झाल्याची घोषणा केली. साराने लंडन येथून वैद्यकीय क्षेत्रात पदवीउत्तर शिक्षण घेतलं आहे.
सचिन तेंडुलकरने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, मला कळवण्यास अतिशय आनंद होत आहे की माझी मुलगी सारा तेंडुलकर STF इंडिया (सचिन तेंडुलकर फाउंडेशन, भारत) मध्ये संचालिका म्हणून सामील झाली आहे. तिने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये पदवीउत्तर शिक्षण घेतलं आहे. क्रीडा, आरोग्यसेवा आणि शिक्षणाच्या माध्यमातून भारताला सक्षम बनवण्याच्या या प्रवासाला ती सुरुवात करत असताना, जागतिक शिक्षण प्रत्येकासाठी कसे उपलब्ध होऊ शकते यासाठी प्रयत्न करेल.
हेही वाचा : फक्त विनोद कांबळीच नाही तर व्यसनामुळे 'या' 4 क्रिकेटर्सचंही करिअर उध्वस्त झालंय
सचिन तेंडुलकर फाउंडेशन हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून सारा अनेकदा आई अंजली आणि वडिलांसोबत या संस्थेकडून राबवण्यात येण्याऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायची. सचिन तेंडुलकर फाऊंडेशन वंचित मुलांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार आरोग्यसेवा देणाऱ्या संस्था आणि महापालिका रुग्णालयांसोबत काम करते. मध्यंतरीच्या काळात सारा तेंडुलकर काही ब्रॅण्ड्ससाठी शूट करायची. ज्यावरून सारा ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असं म्हटलं जात होतं. मात्र त्यावेळी सचिन तेंडुलकरने याबाबत स्पष्ट केलं होतं की सारा बॉलिवूडमध्ये काम करणार नाही तर ती सामाजिक कार्य करण्यासाठी भविष्यात पुढाकार घेईल.
I’m overjoyed to share that my daughter Sara Tendulkar has joined the STF_India as Director.
She holds a Master’s degree in Clinical and Public Health Nutrition from University College London. As she embarks on this journey to empower India through sports, healthcare, an pic.twitter.com/B78HvgbK62
— Sachin Tendulkar (sachin_rt) December 4, 2024
साराने तिचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील प्रतिष्ठित धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केले. मग तिने युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन (UCL) मधून मेडिसिनमध्ये पदवी प्राप्त केली. खरं तर, साराने तिची आई अंजली तेंडुलकर हिच्यासारखा करियरचा मार्ग निवडला. सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली याही बालरोगतज्ज्ञ आहेत. ग्रॅज्युएशननंतर साराने युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडनमधून मास्टर्सही केले. तिने मेडिसिन आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.s