मुंबई : विरोधकांनी अहमदनगरमधल्या कर्जत तालुक्यातल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणावरूनही सरकारला घेरण्याचे संकेत दिले आहेत.
याप्रकरणातला प्रमुख आरोपी संतोष भवारच्या फेसबुकवर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याबरोबरचा फोटो व्हायरल होत असल्याचं म्हटले आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी हा फोटोही दाखवत याप्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची तसंच आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे.
अहमदनगरमधल्या कर्जत तालुक्यातल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्ये प्रकरणी दोन आरोपींना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष भवार आणि नितीन भैलुमे अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.
आरोपींना सुनावणी झाल्यानंतर पोलीस आरोपींना घेऊन बाहेर पडताना शिवप्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आरोपींवर अंडे फेकले. त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. अंडे फेक करणाऱ्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
जितेंद्र शिंदे नावाच्या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली. दरम्यान याप्रकरणात आरोपीचं वकीलपत्र न घेण्याचा इशारा अहमदनगर वकील संघटनेनं दिला आहे. काल याप्रकरणी संतप्त नागरिकांनी कर्जत, श्रीगोंदा आणि जामखेडमध्ये नागरिकांनी बंद पाळला होता.
तसेच पालकमंत्री राम शिंदेंनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनीही मोर्चा स्थळी भेट देऊन सभागृहात आवाज उठवणार असल्याचे सांगितले.