सरकार बदललं, चौकशा वाढल्या

भाजपचं सरकार राज्यात आल्यावर आता राज्यात आघाडी सरकारमधल्या नेत्यांविरोधातल्या चौकशा वाढल्याचं चित्र आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचं नाव असलेल्या घोटाळ्यांबाबत राज्य सरकार आक्रमकपणे उतरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पाहूयात सरकार बदलल्यावर वाढलेल्या या चौकशा

Updated: Nov 6, 2014, 10:00 PM IST
सरकार बदललं, चौकशा वाढल्या title=

मुंबई : भाजपचं सरकार राज्यात आल्यावर आता राज्यात आघाडी सरकारमधल्या नेत्यांविरोधातल्या चौकशा वाढल्याचं चित्र आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचं नाव असलेल्या घोटाळ्यांबाबत राज्य सरकार आक्रमकपणे उतरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पाहूयात सरकार बदलल्यावर वाढलेल्या या चौकशा

१.     माजी राज्यमंत्री सुरेश धस वादाच्या भोवऱ्यात  
•         जमीन व्यवहारांच्या फाईल्स मार्गी लावण्यासाठी लाच स्वीकारल्याप्रकरणी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना अटक
•         अटक केलेल्यांमध्ये काहीजण धस यांचे निकटवर्तीय असल्याचा संशय
•         सुरेश धस यांचं वास्तव्य असलेल्या सरकारी निवासस्थानी एसीबीचा छापा

२.     माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या पीए विरोधात गुन्हा दाखल
•         समाजकल्याण विभागात २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक भ्रष्टाचार झाल्य़ाप्रकरणी गुन्हा
•         शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या संगणक प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्व विकासासाठी ६७ कोटी रुपयांचा निधी
•         वसतिगृहातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण न देता बोगस विद्यार्थ्यांच्या नावे पैसे वाटण्यात आले. 
•         एसीबीने चौकशीनंतर अधिकारी आणि प्रशिक्षण केंद्राविरुद्ध गुन्हा दाखल केला.
•         माजी मंत्री मोघे यांचे पीए प्रशांत अल्ल्याडराव यांच्याविरोधात गुन्हा दाखल

३.     सिंचन घोटाळा 
•         माजी जलसंपदा मंत्री अजित पवार आणि सुनील तटकरेंच्या चौकशीसाठी परवानगीची प्रतीक्षा
•         गृहखात्याकडून परवानगी, फाईल मुख्यसचिवांकडे 
•         मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्यानंतर एसीबीकडून चौकशी होणार
४.     महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा
•         माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप
•         भुजबळांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीची प्रतीक्षा
•         गृहखात्याकडून परवानगी, फाईल मुख्यसचिवांकडे 
 
५.     महाराष्ट्र राज्य सहकारी बँक तोटा
•         अजित पवार आणि अन्य माजी संचालकांना सहकार आयुक्तांची नोटीस 
•         १५ दिवसांत स्पष्टीकरण न दिल्यास कारवाई

६.     भारती विद्यापीठ वादग्रस्त जमीन प्रकरण
•         पुण्याजवळील लवळे गावातील ११२.९१ हेक्टर वादग्रस्त जमीन प्रकरणी गावकरी कोर्टात
•         नियमांचं उल्लंघन करून बांधकाम केल्याबद्दल हायकोर्टाची बांधकामाला स्थगिती 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.