फास आवळला: ईडीद्वारे भुजबळांसह 18 जणांविरोधात 2 गुन्हे दाखल

महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात फास अधिक आवळलाय. एसीबीनंतर आता ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानंही भुजबळांविरोधात 2 गुन्हे दाखल झाले आहेत.

Updated: Jun 17, 2015, 08:40 PM IST
फास आवळला: ईडीद्वारे भुजबळांसह 18 जणांविरोधात 2 गुन्हे दाखल title=

मुंबई: महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात फास अधिक आवळलाय. एसीबीनंतर आता ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानंही भुजबळांविरोधात 2 गुन्हे दाखल झाले आहेत.

ईडीनं भुजबळांसह मुलगा पंकज, पुतण्या समीर यांच्यासह 18 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. बेहिशेबी मालमत्ता आणि हेक्स वर्ल्ड गृहप्रकल्पातील गैरव्यवहाराविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. 

दरम्यान, काल दिवसभर छगन भुजबळ यांच्या सर्व निवासस्थानं, कार्यालय आणि बंगल्यांवर एसीबीचं छापासत्र सुरू होतं. राजेशाही थाट असलेल्या भुजबळ फार्मवर लाचलुचपत विभागाची चौकशी उशिरा मध्यरात्रीपर्यंत सुरु होती. या फार्मवरील ऐश्वर्यानं अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे झाले होते. कोट्यवधी रुपये किंमतीच्या पुरातन वस्तू, फाईव्ह स्टार सुविधा आणि राजेशाहीला साजेसा थाट झाडाझडतीच्या मागणी तपशिलात नोंदविण्यासाठी अपूर्ण पड़त होता. नोंदीनुसार क्षेत्राचं मोजमाप करून मालमत्तेची किंमत ठरविनं विभागातील अधिकाऱ्यांना चक्रावणारा ठरला. तब्बल सोळा तास चाललेल्या या चौकशीत काही मालमत्तांची कागदपत्रं हाती लागलीत. वेगवेगळ्या नावावर असलेले साताबरे आणि बेनामी संपत्तीचे तपशील ईडीकडे सोपवण्यात येणार असल्यानं भुजबळांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.