हवाईसुंदरीची पप्पू यादवकडून छेडछाड

जेट एअरवेजच्या विमानातील हवाईसुंदरीची, राष्ट्रीय जनता दलाचे बडतर्फ खासदार पप्पू यादव यांनी मंगळवारी छेडछाड केली असल्याचं सांगण्यात येतंय.

Updated: Jun 17, 2015, 01:25 PM IST
हवाईसुंदरीची पप्पू यादवकडून छेडछाड  title=

नवी दिल्ली : जेट एअरवेजच्या विमानातील हवाईसुंदरीची, राष्ट्रीय जनता दलाचे बडतर्फ खासदार पप्पू यादव यांनी मंगळवारी छेडछाड केली असल्याचं सांगण्यात येतंय.

पाटणाहून नवी दिल्लीकडे जात असलेल्या जेट एअरवेजच्या विमानात ही घटना घडली. पप्पू यादव यांनी देण्यात आलेले जेवण त्यांनी येण्या-जाण्याच्या वाटेत फेकण्यास सुरवात केली. 

यावरून हवाईसुंदरीने त्यांना रोखल्याने यादव यांनी वैमानिकाच्या केबीनसमोर जात गोंधळ घालण्यास सुरवात केली आणि हवाईसुंदरीची छेडछाड केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांनीही प्रवाशाचे नाव न घेता अशी घटना घडल्याचे सांगितले. या प्रकरणी कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.

या प्रकरणी यादव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अशी काही घटना विमानात घडली नसल्याचे सांगितले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.