२१२ नगर पालिकांच्या निवडणुकीच्या तारखा घोषीत

 नगरपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. 

Updated: Oct 17, 2016, 04:44 PM IST
२१२ नगर पालिकांच्या निवडणुकीच्या तारखा घोषीत  title=

मुंबई :  नगरपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. 

खाली संंपूर्ण यादी दिली आहे... स्क्रोल करा

या निवडणुकीसाठी चार टप्प्यांत मतदान होणार आहे. नगरपालिकांसाठी 27 नोव्हेंबर, 14 डिसेंबर, 18 डिसेंबर आणि 8 जानेवारी या तारखांना मतदान घेण्यात येणार आहे. 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदान झाल्यानंतर दुस-याच दिवशी त्या नगरपालिकांची मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळं निकालाची तारीख सर्वठिकाणी वेगवेगळी असणार आहे. 

यंदा नगरपालिकांसाठी नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्यात येणार आहे. मात्र नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड निवडून आलेले नगरसेवकच करणार असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त जे एस. सहारिया यांनी सांगितलंय. 

निवडणूक आयुक्त पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे 

- १९४ नगरपरिषद आणि नगरपंतायतींची मुदत डिसेंबरमध्ये संपत आहे 
- १८ नव्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींचीही निवडणूक
- २१२ साठी निवडणूक 
- २ चा विषय न्यायालयात आहे 
- चार टप्प्यात निवडणुका होणार
- रविवार २७ नोव्हेंबरला १६५ साठी निवडणूक

- राज्यातील पालिकांसाठी चार टप्प्यात होणार निवडणूक 

- २७ डिसेंबर त ८ जानेवारी दरम्यान होणार मतदान 

- २७ डिसेंबरला एकूण २५ जिल्ह्यात आणि १६५ नगरपरिषदांसाठी निवडणूक 

- १४ डिसेंबर ला पुणे आणि लातूर जिल्ह्यातील १४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूक, मतमोजणी १५ डिसेंबरला

- मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच होणार मतमोजणी 

- ३ रा टप्पा ४ जिल्हातील २२ ची निवडणूक 
- १८ डिसेंबर रोजी मतदान औरंगाबाद, नांदेड, गडचिरोलीत मतदान

- चौथा टप्पा नागपूर गोंदिया जिल्ह्यातील ११ नगरपालिकांसाठी ८ जानेवारी रोजी मतदान

 - पनवेल आणि नागभीड नगरपंतायत न्यायालयात असल्याने निवडणूक नाही
 
 - पालघर, धुळे, नंदुरबार, हिंगोली, वाशीम, गडचिरोली, गोंदिया या सात जिल्ह्यात अंशता आचारसंहिता इतर जिल्हात संपूर्ण आचारसंहिता
 
- मुंबई, ठाणेमध्ये निवडणूक नसल्याने या जिल्ह्यात आचारसंहिता नाही

- १९२ नगरपरिषदा आहेत तिथे थेट जमतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. 

- या ठिकाणी मतदारांना ३ ते चार मतदान करावे लागणार

निवडणूक होणाऱ्या नगरपरिषदा व नगरपंचायतींची नावे

टप्पा क्र. 1: 
27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होणाऱ्या नगरपरिषदा व नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी: पालघर: 1) विक्रमगड (नवीन न.पं.), 2) तलासरी (नवीन न.पं.) व 3) मोखाडा (नवीन न.पं.). रायगड: 1) खोपोली, 2) उरण, 3) पेण, 4) अलिबाग, 5) मुरूड-जंजिरा, 6) रोहा, 7) श्रीवर्धन, 8) महाड, व 9) माथेरान. रत्नागिरी: 1) चिपळूण, 2) रत्नागिरी, 3) दापोली न.पं., 4) खेड व 5) राजापूर. सिंधुदुर्ग: 1) वेंगुर्ले, 2) सावंतवाडी, 3) मालवण व 4) देवगड-जामसांडे (नवीन न.पं.). सोलापूर: 1) बार्शी, 2) पंढरपूर, 3) अक्कलकोट, 4) करमाळा, 5) कुर्डूवाडी, 6) सांगोला, 7) मंगळवेढा, 8) मैंदर्गी व 9) दुधनी. कोल्हापूर: 1) इचलकरंजी, 2) जयसिंगपूर, 3) मलकापूर, 4) वडगाव-कसबा, 5) कुरूंदवाड, 6) कागल, 7) मुरगुड, 8) गडहिंग्लज व 9) पन्हाळा. सांगली: 1) इस्लामपूर, 2) विटा, 3) आष्टा, 4) तासगाव, 5) कवठे-महाकाळ (नवीन न.पं.), 6) कडेगाव (नवीन न.पं.) 7) खानापूर (नवीन न.पं.), 8) शिरोळा (नवीन न.पं.) व 9) पलूस (नवीन नगर परिषद). सातारा: 1) सातारा, 2) फलटण, 3) कराड, 4) वाई, 5) म्हसवड, 6) रहिमतपूर, 7) महाबळेश्वर, 8) पाचगणी, 9) कोरेगाव (नवीन न.पं.), 10) मेढा (नवीन न.पं.), 11) पाटण (नवीन न.पं.), 12) वडूज (नवीन न.पं.), 13) खंडाळा (नवीन न.पं.)  व 14) दहिवडी (नवीन न.पं.). नाशिक: 1) मनमाड, 2) सिन्नर, 3) येवला, 4) सटाणा, 5) नांदगाव व 6) भगूर. अहमदनगर: 1) संगमनेर, 2) कोपरगाव, 3) श्रीरामपूर, 4) शिर्डी, 5) रहाता, 6) पाथर्डी, 7) राहुरी व 8) देवळाली प्रवरा. नंदुरबार: 1) शहादा. धुळे: 1) शिरपूर-वरवाडे व 2) दोंडाईचा-वरवाडे. जळगाव: 1) भुसावळ, 2) चोपडा, 3) अंमळनेर, 4) चाळीसगाव, 5) पाचोरा, 6) यावल, 7) फैजपूर, 8) सावदा, 9) रावेर, 10) एरंडोल, 11) धरणगाव, 12) पारोळा व 13) बोदवड (नवीन न.पं.). जालना: 1) जालना, 2) भोकरदन, 3) अंबड व 4) परतूर. परभणी: 1) गंगाखेड, 2) सेलू, 3) जिंतूर, 4) मानवत, 5) पाथरी, 6) सोनपेठ व 7) पूर्णा. हिंगोली: 1) हिंगोली, 2) बसमतनगर व 3) कळमनुरी. बीड: 1) बीड, 2) माजलगाव, 3) परळी-वैजनाथ, 4) अंबेजोगाई, 5) गेवराई व 6) धारूर. उस्मानाबाद: 1) उस्मानाबाद, 2) परांडा, 3) भूम, 4) कळंब, 5) तुळजापूर, 6) नळदुर्ग, 7) मुरूम व 8) उमरगा. यवतमाळ: 1) यवतमाळ, 2) दिग्रस, 3) पुसद, 4) उमरखेड, 5) वणी, 6) घाटंजी, 7) आर्णी व 8) दारव्हा. अकोला: 1) अकोट, 2) बाळापूर, 3) मूर्तिजापूर, 4) तेल्हारा व 5) पातूर. वाशीम: 1) कारंजा, 2) वाशीम व 3) मंगरूळपीर. अमरावती: 1) अचलपूर, 2) अंजनगावसूर्जी, 3) वरूड, 4) चांदुरबाजार, 5) मोर्शी, 6) शेंदुरजनाघाट, 7) दर्यापूर, 8) चांदूर रेल्वे व 9) धामणगाव. बुलडाणा: 1) शेगाव, 2) नांदुरा, 3) मलकापूर, 4) खामगाव, 5) मेहकर, 6) चिखली, 7) बुलडाणा, 8)  जळगाव-जामोद व 9) देऊळगाव राजा. वर्धा: 1) वर्धा, 2) हिंगणघाट, 3) आर्वी, 4) सिंदी, 5) पुलगांव व 6) देवळी. चंद्रपूर: 1) बल्लारपूर, 2) वरोरा, 3) मूल, 4) राजुरा व 5) सिंदेवाही (नवीन न.पं.) (एकूण 147 नगरपरिषदा व 18 नगरपंचायती).
टप्पा क्र. 2: 
14 डिसेंबर 2016 रोजी मतदान होणाऱ्या नगरपरिषदांची जिल्हानिहाय नावे अशी: पुणे: 1) बारामती, 2) लोणावळा, 3) दौड, 4) तळेगाव-दाभाडे, 5) आळंदी, 6) इंदापूर, 7) जेजुरी, 8) जुन्नर, 9) सासवड व 10) शिरूर. लातूर: 1) उदगीर, 2) औसा, 3) निलंगा व 4) अहमदपूर. (एकूण 14 नगरपरिषदा).
टप्पा क्र. 3:  
18 डिसेंबर 2016 रोजी मतदान होणाऱ्या नगरपरिषदा व नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी: औरंगाबाद: 1) वैजापूर, 2) कन्नड, 3) पैठण, 4) गंगापूर व 5) खुल्ताबाद. नांदेड: 1) धर्माबाद, 2) उमरी, 3) हदगाव, 4) मुखेड, 5) बिलोली, 6) कंधार, 7) कुंडलवाडी, 8) मुदखेड, 9) देगलूर, 10) अर्धापूर (न.पं.) व 11) माहूर (न.पं.). भंडारा: 1) पवनी, 2) भंडारा, 3) तुमसर व 4) साकोली (नवीन न.पं.). गडचिरोली: 1) गडचिरोली व 2) देसाईगंज (एकूण 20 नगरपरिषदा व 2 नगरपंचायती).
टप्पा क्र. 4:
8 जानेवारी 2016 रोजी मतदान होणाऱ्या नगरपरिषदांची जिल्हानिहाय नावे अशी: नागपूर: 1) कामटी, 2) उमरेड, 3) काटोल, 4) कळमेश्वर, 5) मोहपा, 6) रामटेक, 7) नरखेड, 8) खापा व 9) सावनेर. गोंदिया: 1) तिरोरा व 2) गोंदिया (एकूण 11 नगरपरिषदा).