विजय माल्या यांची कोकणातील जमीन जप्त

किंकफिशर मॅन विजय माल्ल्या यांच्या मालकीच्या कोकणात असलेल्या युनायटेड ब्रेव्हरीज इंडिया लिमिटेड (युबीआयएल) या कंपनीची रत्नागिरीतील चिपळूण येथील एक एकर जागा जप्त करण्यात आलेय.

Updated: Mar 22, 2016, 03:57 PM IST
विजय माल्या यांची कोकणातील जमीन जप्त title=

मुंबई : किंकफिशर मॅन विजय माल्ल्या यांच्या मालकीच्या कोकणात असलेल्या युनायटेड ब्रेव्हरीज इंडिया लिमिटेड (युबीआयएल) या कंपनीची रत्नागिरीतील चिपळूण येथील एक एकर जागा जप्त करण्यात आलेय.

 

चिपळूण तालुक्यातील पिंपळ बुद्रुक गावी माल्ल्या यांची एक एकर जमीन आहे. या जमिनीवर युनायटेड ब्रेव्हरीज इंडिया लिमिटेड नावाची कंपनी उभी होती. ही जागा बिनशेती करण्यात आली होती. मात्र, गेली दोन वर्षे बिनशेतीचा सुमारे ४५ हजारांचा कर माल्ल्या यांनी थकवला होता. त्यामुळे चिपळूणच्या महसूल प्रशासनाने ही जमीन जप्त केलेय.

चिपळूणच्या तहसीलदार वृषाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ही कंपनी आतापर्यंत बंदच होती. या एक एकर जागेवर सुमारे १० ते १२ पडक्या इमारती आहेत.