नाशिक : नाशिक विधान परिषद निवडणूकी संदर्भात मुंबई हायकोर्टानं आज एक ऐतिहासिक निकाल दिलाय. हायकोर्टानं शिवेसेना उमेदवार शिवाजी सहाने विजयी घोषित केलंय तर राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांना ठरवण्यात आलंय.
नाशिक विधानपरिषद निवडणुकीतील बाद मत प्रकरणी दाखल केलेल्या शिवाजी सहाणेंच्या याचिकेवर न्या. राजेश केतकर यांनी हा निकाल दिलाय.
मे २०१२ मध्ये झालेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीत तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी पी. वेलरासू यांनी शिवाजी सहाणे यांची चार मते बाद ठरवली गेली होती. निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना शिवसेनेच्या शिवाजी सहाणे आणि जयंत जाधव यांना २२१ अशी समान मतं मिळाली होती. त्यामुळे टाकून उमेदवार विजयी घोषित करण्यात आला. त्यात राष्ट्रवादीच्या जयंत जाधव यांचा विजय झाला होता. तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या दबावाखाली येऊन वेलरासू यांनी निकाल दिल्याचा आरोप करण्यात आला होता.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला सहाणे यांनी १९ जून २०१२ रोजी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. गेल्या दोन वर्षापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. सर्वप्रथम न्या. अनुप मोहता यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली. मात्र मोहता यांनी मध्येच ही केस सोडली. त्यानंतर न्या. ए. आर. जोशी यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. मात्र, त्यांचीही सहा महिन्यातच बदली झाली. त्यानंतर हा खटला न्या. केतकर यांच्या पीठाकडे वर्ग करण्यात आला होता. विधानपरिषदेची ही निवडणूक भुजबळांनी प्रतिष्ठेची बनवली होती.
जाधवांना अपात्र ठरवण्यात आल्यानं ही भुजबळांना मोठी चपराक समजली जातेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.