अबब... १६ छाप्यांत भुजबळांकडे सापडलेली ही संपत्ती!

 छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेवर एसीबीनं तब्बल १६ ठिकाणी छापे घातले. त्यामध्ये डोळे गरगरून जातील, एवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता सापडलीय. 

Updated: Jun 16, 2015, 08:19 PM IST
अबब... १६ छाप्यांत भुजबळांकडे सापडलेली ही संपत्ती! title=

मुंबई : छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेवर एसीबीनं तब्बल १६ ठिकाणी छापे घातले. त्यामध्ये डोळे गरगरून जातील, एवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता सापडलीय. 

या मालमत्तेची किंमत बाजारभावानं करोडो रूपयांच्या घरात आहे. यापैकी नाशिक येथील भुजबळ फार्ममधील भुजबळ पॅलेस हा बंगलाच तब्बल 100 कोटी रूपयांचा आहे, अशी माहिती एसीबीनं दिलीय. 46 हजार 500 चौरस फुटांच्या या बंगल्यात सुमारे 25 खोल्या आहेत. तिथं स्विमिंग टँक आणि जिमचे बांधकाम सुरू आहे. त्याशिवाय भुजबळ कुटुंबियांकडे तब्बल 6 बंगले, विविध इमारतींमध्ये 20 सदनिका आणि 10 व्यापारी गाळे आढळल्याची माहितीही एसीबीनं दिलीय... मुंबई, नवी मुंबई, नाशिक, पुणे, येवला आणि मनमाड भागात भुजबळ कुटुंबियांनी ही माया गोळा केलीय...

भुजबळांच्या तीन बंगल्यावर स्थावर आणि जंगम मालमत्ता शोध मोहीम अजूनही सुरू आहे. यात निवासी परिसराचे मोजमाप वाहने सोने दागिने मालमत्ता कागदपत्रे तसच लॉकर्स बाबत माहिती मिळवण्याचं काम सुरू आहे. भुजबळ कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या बेनामी संपत्तीचे तपशील मिळवणं हे या मोहिमेचं लक्ष्य आहे. 

महाराष्ट्रभरात भुजबळ कुटुंबीयांच्या नावावर आत्तापर्यंत १७ मालमत्ता सापडल्यात... एक नजर टाकुयात... 

मुंबईतील संपत्ती...  

१. सुखदा को ऑप हाऊसिंग सोसायटी, फ्लॅट क्रमांक १९०१, वरळी, मुंबई ( २००० स्केअर फूटचा फ्लॅट आणि एक टोयोटा कार) 

२. मलेशिया अपार्टमेंट, माझगाव, मुंबई इथं ६०० स्क्वेअर फुटाचे तीन फ्लॅट (छगन भुजबळ यांच्या नावावर) 

३. मानेक महल, पाचवा मजला, चर्चगेट इथं १२०० स्क्वेअर फुटाचा फ्लॅट (पंकज भुजबळ यांच्या नावावर)

४. मानेक महल, सातवा मजला इथं १२०० स्केअर फुटाचा फ्लॅट (मीना छगन भुजबळ यांच्या नावावर असलेला हा फ्लॅट भाड्याने दिलेला आहे.)

५. सागर मंदिर को ऑप सोसायटी, शिवाजी पार्क इथं ६०० स्क्वेअर फुटाचा फ्लॅट (हिराबाई मगन भुजबळ यांच्या नावावर)

६. साईकुंज, दादर इथं एकूण चार फ्लॅट आणि एक गाळा
 - फ्लॅट क्र. ४ - १५०० स्क्वेअर फूट - विशाखा भुजबळ
- फ्लॅट क्र. ५ - १२०० स्क्वेअर फूट - शेफाली भुजबळ
- फ्लॅट क्र. ७ - १५०० स्क्वेअर फूट - हिराबाई भुजबळ
- फ्लॅट क्र. २ - १२०० स्क्वेअर फूट -  मीना भुजबळ
- तळ मजल्यावरचा १५०० फुटाचा गाळा भाड्याने दिलेला आहे.

७. सॉलिटेअर बिल्डिंग, सांताक्रुझ, मुंबई इथं...
- संपूर्ण पाचवा मजला, २५०० स्क्वेअर फूट - समीर भुजबळ
- संपूर्ण सातवा मजला, २५०० स्क्वेअर फूट - पंकज भुजबळ
- संपूर्ण आठवा मजला, २५०० स्क्वेअर फूट - मीना भुजबळ

ठाण्यातील संपत्ती... 

८. ७/बी विंग, मारुती एन्क्लेव्ह सोसायटी, १३०५ आणि ५०१ क्रमांकाचे दोन फ्लॅट - पंकज भुजबळ यांच्या नावावर

९. १०५/ बी विंग, मारुती पॅराडाईज, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई. १३०५ स्क्वेअर फुटाचा फ्लॅट - दुर्गा भुजबळ यांच्या नावावर

१०. मारुती पॅराडाईज, सेक्टर १५, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई इथं एकूण नऊ कमर्शिअल शॉप्स भाड्यानं दिलेले आहेत. तर सात बंद आहेत. ते 'भुजबळ ग्रुप' या नावानं आहेत.

११. १०२, बी विंग, एव्हरेस्ट सोसायटी, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई इथं १३०० स्क्वेअर फुटाचा फ्लॅट - पंकज भुजबळ यांच्या नावाने

१२. लाजवंती बंगला, फ्लॉट नं ४६, पारसिक हिल, सीबीडी बेलापूर इथं १३०० स्क्वेअर फुटाचा बंगला - मीना भुजबळ यांच्या नावावर

पुणे येथील संपत्ती...
१३. लोणावळा बंगला, पुणे इथं ८२ हेक्टरवर पसरलेला ६ बेडरुम्सचा बंगला.... किंमत ५ करोड... पंकज आणि समीर भुजबळ यांच्या नावावर

१४. फ्लॅट क्रमांक २०८, तिसरा मजला, संगमवाडी, पुणे - समीर भुजबळ यांच्या नावार

नाशिक इथली संपत्ती...
१५. चंद्राई बंगला, भुजबळ फार्म, नाशिक - १००० स्क्वेअर फुटाचा बंगला - मीना भुजबळ

१६. भुजबळ पॅलेस, भुजबळ फार्म, नाशिक - ४६,५०० स्क्वेअर फुटाचा बंगला, २५ रुम्स, स्विमिंग पूल, जिमसहीत (अंदाजे किंमत १०० करोड)  - पंकज भुजबळ यांच्या नावावर

१७. येवला बंगला, नाशिक इथं ५००० स्क्वेअर फुटाचा ११ रुम्सचा बंगला - पंकज भुजबळ यांच्या नावावर

१८. मनमाड बंगला, ३००० स्क्वेअर फुटांचा बंगला - पंकज भुजबळ यांच्या नावावर

१९. राम बंगला, नाशिक, १५०० फुटांचा बंगला  - समीर भुजबळ यांच्या नावावर

नोट...  अजूनही भुजबळ यांच्या मालमत्ता शोधून काढण्याचं काम सुरूच आहे.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.