29,600 गावांमध्ये दुष्काळ घोषीत

मे महिन्याचे 11 दिवस उलटल्यावर राज्य सरकारला राज्यातल्या 33 जिल्ह्यातल्या 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ असल्याचा साक्षात्कार झाला आहे.

Updated: May 12, 2016, 05:50 PM IST
29,600 गावांमध्ये दुष्काळ घोषीत title=

मुंबई: मे महिन्याचे 11 दिवस उलटल्यावर राज्य सरकारला राज्यातल्या 33 जिल्ह्यातल्या 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ असल्याचा साक्षात्कार झाला आहे.  2015-16 मध्ये खरीप हंगामातील अंतिम आणेवारी ज्या गावांमध्ये 50 पैसापेक्षा कमी आहे, त्या गावांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. 

याआधी या गावांना दुष्काळसदृष्य म्हणून घोषित करण्यात आलं होतं. तसेच विविध योजना आखण्यात आल्या होत्या. आता दुष्काळ जाहीर केल्याचं परिपत्रक सरकारने काढलं आहे.  

दरम्यान न्यायालयाचे ताशेरे येऊ नये म्हणून सरकारनं दुष्काळ जाहीर केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. दुष्काळग्रस्तांना न्याय द्यायला सरकार कमी पडल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.