कोकणात सिंधुदुर्गात जोरदार पाऊस, रत्नागिरीत तुरळक

सिंधुदुर्गमध्ये कुडाळ, सावंतवाडी आणि कणकवलीच्या काही भागात आज जोरदार पाऊस पडला. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 4, 2017, 09:39 PM IST
कोकणात सिंधुदुर्गात जोरदार पाऊस, रत्नागिरीत तुरळक
संग्रहित छाया

ओरस : सिंधुदुर्गमध्ये कुडाळ, सावंतवाडी आणि कणकवलीच्या काही भागात आज जोरदार पाऊस पडला. 

पावसामुळे उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. पाऊस सह्याद्रीच्या पट्ट्यात पडलाय. त्यामुळे साहजिकच हापूसला मात्र कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा हवामान तज्ज्ञांनी दिलाय. 

दोन दिवसांपूर्वी हवामान विभागाने कोकणात गारपीटीसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र, रत्नागिरीत काही ठिकाणी पावसाचा शिंतोडा झाला. या पावसामुळे आंबा, काजू पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.