पुणेकरांना नववर्ष सेलिब्रेशनसाठी खुशखबर

 नववर्षाचे स्वागत करणाऱ्या पुणेकरांसाठी एक खुशखबर आहे, सेलिब्रेशनसाठी पुणे शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्‍लब यांना पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास शहर पोलिसांनी परवानगी दिलीय. मात्र, हॉटेल सुरू ठेवल्यास तेथील सुरक्षेची सर्व जबाबदारी ही त्या-त्या हॉटेलांवर टाकण्यात आली आहे. 

Updated: Dec 28, 2014, 08:08 PM IST
पुणेकरांना नववर्ष सेलिब्रेशनसाठी खुशखबर title=

पुणे :  नववर्षाचे स्वागत करणाऱ्या पुणेकरांसाठी एक खुशखबर आहे, सेलिब्रेशनसाठी पुणे शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्‍लब यांना पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास शहर पोलिसांनी परवानगी दिलीय. मात्र, हॉटेल सुरू ठेवल्यास तेथील सुरक्षेची सर्व जबाबदारी ही त्या-त्या हॉटेलांवर टाकण्यात आली आहे. 

पुण्यात साधारणपणे रात्री साडेबारापर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी आहे. परंतु हॉटेल चालकांची मागणी लक्षात घेता गुरुवारी नववर्षाच्या निमित्ताने पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी पोलिसांनी दिली आहे. 

मात्र काही मद्यपींचा धुडगूस रोखण्याची जबाबदारी पोलिसांनी या हॉटेलांवर टाकली आहे. त्यासाठी हॉटेलांच्या आतील व बाहेरील बाजूलाही पुरेसे खासगी सुरक्षारक्षक तैनात करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचा आदेश हॉटेल चालकांना देण्यात आला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.