भाजपची चिंता काँग्रेसने वाढविली

महानगर नियोजन समितीच्या (मेट्रोरिजन) निवडणुकीसाठी काँग्रेसने भाजपला पेचात पकडले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंता आहे. १७ मे रोजी निवडणूक होणार आहे.

Updated: Apr 26, 2015, 06:05 PM IST
भाजपची चिंता काँग्रेसने वाढविली title=

नागपूर : महानगर नियोजन समितीच्या (मेट्रोरिजन) निवडणुकीसाठी काँग्रेसने भाजपला पेचात पकडले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंता आहे. १७ मे रोजी निवडणूक होणार आहे.

काँग्रेसने आपल्या कोट्यातून एका जागेवर अधिकचा उमेदवार दिला आहे. त्यामुळे भाजपपुढे पेच निर्माण झाला आहे. नागपुरच्या बालेकिल्लात  भाजपला जेरीस आणण्याचा चंग काँग्रेसने उचलेला दिसत आहे. काँग्रेसने पाच नव्हे तर सहा नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. 

काँग्रेसचे ४१ नगरसेवक आहेत. एका जागेसाठी ७ चा कोटा यानुसार ३५ नगरसेवकांध्येच पाच जागा निवडून येतात. शेवटी सहा नगरसेवक उरतात. एक नगरसेवक कमी असतानाही काँग्रेसने सहावा अर्ज दाखल केला असल्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. शहरी भागातील मतदारसंघासाठी काँग्रेसने संजय महाकाळकर, दीपक कापसे, अरुण डवरे, प्रशांत धवड, रेखा बारहाते आणि सुरेश जग्यासी या सहा नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे.

या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या प्रमुख नेत्यांची बैठक घेत रणणिती आखली होती. तर काँग्रेसमध्येही सर्व नेत्यांनी आपसात समन्वय साधत उमेदवार निश्चित केले. शहरी मतदारसंघात एक उमेदवार निवडून येण्यासाठी ७ चा कोटा निश्चित करण्यात आला आहे. पाच सदस्य निवडून आल्यावरी काँग्रेसचे पाच नगरसेवक उरतात. यात एका मताची जुळवाजळव केली तर आणखी एक नगरसेवक निवडून येऊ शकतो. काँग्रेसने ही रिस्क घेतली असून एक उमेदवार रिंगणात उतरविला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.