धडक कारवाईत जिल्हाधिकाऱ्यांची बोट वाळूत रूतली

कल्याण खाडीकिनारी सुरु असलेल्या बेकायदा वाळू उपशा विरोधात धडक कारवाई करणा-या जिल्हाधिका-यांची बोट गाळात रुतली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 9, 2017, 10:32 AM IST
धडक कारवाईत जिल्हाधिकाऱ्यांची बोट वाळूत रूतली title=

कल्याण : कल्याण खाडीकिनारी सुरु असलेल्या बेकायदा वाळू उपशा विरोधात धडक कारवाई करणा-या जिल्हाधिका-यांची बोट गाळात रुतली. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी ५ एप्रिलपासून, इथल्या बेकायदा वाळू उपशा विरोधात जोरदार मोहीम उघडलीय. स्वतः जिल्हाधिकारी अहोरात्र घटनास्थळी उपस्थित राहून नजर ठेऊन आहेत.

दरम्यान संध्याकाळी जिल्हाधिकारी इतर अधिका-यांसह ठाकुर्लीजवळच्या खाडीत बोटीनं उतरुन, कारवाईची पाहणी करत होते. मात्र अचानक आलेल्या ओहोटीमुळे, त्यांची बोट गाळात रुतली. त्यामुळे सुमारे तासभर जिल्हाधिका-यांसह एकंदर १४ जण बोटीत गाळातच अडकून पडले होते. अखेर तातडीनं अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी येऊन, या सर्वांना सुखरुप समुद्रकिनारी आणलं.