भाजपच्या खेळीने अजित पवार संतापलेत, राष्ट्रवादीत वातावरण तापलं

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आता राजकीय पट तयार होऊ लागलाय. भाजपकडून आमदार लक्ष्मण जगताप यांची शहर अध्यक्षपदी निवड झाल्यावर अजित पवार यांनी टीका केलीय. त्यामुळे भाजप राष्ट्रवादी यांच्यात वातावरण तापलंय.

Updated: Jan 22, 2016, 11:14 PM IST
भाजपच्या खेळीने अजित पवार संतापलेत, राष्ट्रवादीत वातावरण तापलं title=

पिंपरी, पुणे : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आता राजकीय पट तयार होऊ लागलाय. भाजपकडून आमदार लक्ष्मण जगताप यांची शहर अध्यक्षपदी निवड झाल्यावर अजित पवार यांनी टीका केलीय. त्यामुळे भाजप राष्ट्रवादी यांच्यात वातावरण तापलंय.

 
मुंबई, पुणे,नाशिक या शहरांसह फेब्रुवारी २०१७ मध्ये पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचीही निवडणूक होतेय. राजकीय पक्षांनी त्यासाठीचे डावपेच टाकायला सुरुवात केलीय. भाजपने लक्ष्मण जगताप यांची शहराध्यक्षपदी निवड करत सुरुवात केली. या निवडीनंतर शहरात आलेल्या अजित पवार यांनी मग लक्ष्मण जगताप यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केलीय. 

शहराध्यक्ष झाल्यामुळे जगताप यांच्यावर महापालिका निवडणुकीत यश मिळवण्याचं आव्हान आहे तर अजित पवार यांच्यावर सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे…! त्यामुळे आता हा राजकीय पट आणखी रंजक होणार आहे यात शंकाच नाही!