अरोरा सिनेमागृहातल्या पाण्याच्या टाकीतून रोकड, मतदार यादी जप्त

मांटुग्यातल्या अरोरा सिनेमागृहातल्या पाण्याच्या टाकीतून दहा हजार रुपयांची रोकड आणि निवडणूक मतदार यादी जप्त करण्यात आलीय. 

Updated: Oct 10, 2014, 11:36 AM IST
अरोरा सिनेमागृहातल्या पाण्याच्या टाकीतून रोकड, मतदार यादी जप्त title=

मुंबई: मांटुग्यातल्या अरोरा सिनेमागृहातल्या पाण्याच्या टाकीतून दहा हजार रुपयांची रोकड आणि निवडणूक मतदार यादी जप्त करण्यात आलीय. 

निवडणूक काळात पैसे वाटप होत असल्याची तक्रार शिवसेनेच्या बाबूराव माने यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीनं अरोरा सिनेमागृहात चौकशी केली असता पाण्याच्या टाकीत दहा हजार आणि मतदार यादी पोलिसांनी जप्त केलीय. 

पोलीस किंवा निवडणूक अधिकाऱ्यांनी यावर बोलण्यास नकार दिलाय. मात्र सिनेमागृहाचे मालक गणेश यादव यांनी हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केलाय. गणेश यादव हे काँग्रेसचे पदाधिकारी असून वर्षा गायकवाड यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.