कपिल शर्मा शोला चॅनलचा अल्टिमेटम

कपिल शर्माच्या शोचा वाद काही संपायचं नाव घेत नाहीये. त्याच्या चिंतेत भर म्हणून की काय आता सोनी चॅनलनेही त्याला अल्टिमेटमच दिलाय.

Intern Intern | Updated: Apr 3, 2017, 03:58 PM IST
कपिल शर्मा शोला चॅनलचा अल्टिमेटम title=

मुंबई : कपिल शर्माच्या शोचा वाद काही संपायचं नाव घेत नाहीये. त्याच्या चिंतेत भर म्हणून की काय आता सोनी चॅनलनेही त्याला अल्टिमेटमच दिलाय.

पुढच्या महिन्याभरात जर शो नियमितपणे सुरु झाला नाही, तर कपिलसहीत त्याच्या शोची गच्छंती करण्याची 'धमकी' चॅनलने दिलेय.

कारण एप्रिल महिन्यात द कपिल शर्मा शो आणि त्यातील सर्व कलाकारांचे करार नव्याने करण्यात येणार होते. त्यासाठी जवळपास १०० करोडांची डील होणार होती.

मात्र कार्यक्रमाची सद्यस्थिती पाहता शो पुढे चालु ठेवायचा की नाही याबाबत चॅनल आता विचार करतंय.

तसंच कपिल आणि सुनिल ग्रोवरच्या वादात शोचा टीआरपी खूप खाली घसरतोय. कारण त्यांचे वाद मिटत नाहीयेत आणि तो शो काही नीट चित्रीत होत नाहीये. 

आधीच्या टीमशिवाय झालेल्या शुटींगमध्ये उपस्थितांना हसवणं कपिलला खूप जड जात होतं. एक शुट तर याच कारणाने रद्द करावं लागलं.

टेलिकास्ट झालेले हे एपिसो़ड्सही जास्त दर्शक जमा करू शकले नाहीत. तसंच युट्युबवरही त्यांना दर्शकांनी पसंतीपेक्षा नापसंती जास्त दाखवली.