सिंघम रिटर्न्सने मारली बाजी

Updated: Aug 17, 2014, 06:47 PM IST
सिंघम रिटर्न्सने मारली बाजी title=

मुंबईः अजय देवगण आणि करीना कपूर यांचा सिंघम रिर्टन्स या चित्रपटाने बॅाक्स ऑफिसवर चांगलीच धमाल केली आहे. शुक्रवारी आणि शनिवारी या चित्रपटाने तब्बल 53 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट या वर्षातला सगळ्यात मोठा सुपरहिट चित्रपट ठरू शकतो. कारण आतापर्यंत सगळयात मोठी ओपनिंग या चित्रपटाला मिळाली आहे

या चित्रपटाने सलमान खानच्या किक या चित्रपटाप्रमाणे दोन दिवसात 53 कोटींची कमाई केली आहे. अजय देवगणचा हा चित्रपट त्यांचा करियरमधला सगळ्यात मोठा हिट चित्रपट ठरु शकतो. मुंबई ,पुणे, दिल्ली, पंजाब, राजस्थान या ठिकाणी चित्रपटाने मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे

रविवारी हा चित्रपट अजून चांगली कमाई करू शकतो. तज्ज्ञांच्या मते रविवारी हा चित्रपट 20 ते 22 कोटींची कमाई करणार आहे. तसंच रोहित शेट्टीचा हा चित्रपट या वर्षातला सगळ्यात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.
   

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.