पाकिस्तानच्या मॉडेलने तोडल्या 'बोल्ड'नेसच्या सीमा

पाकिस्तानची मॉडेल देणार सनी लिऑनला टक्कर

Updated: Feb 16, 2016, 11:19 AM IST
पाकिस्तानच्या मॉडेलने तोडल्या 'बोल्ड'नेसच्या सीमा title=

नवी दिल्ली : पॉर्न स्टार सनी लिऑन हिने बॉलिवूडमध्ये एंट्री केल्यानतंर एक बॉलिवूड अभिनेत्री म्हणून तिने आज आपली ओळख मिळवली. याआधी तिची ओळख फक्त पॉर्न स्टार म्हणूनच होती. 

सनी लिऑन सारख्या अनेक पॉर्न स्टार जगभरात आहेत. अशीच एक पाकिस्तानातील मॉडेल तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. तहमीना अफजल ही याआधी म्यूझिक व्हिडिओ आणि मॅगझिनमध्ये देखील दिसली होती.

पाकिस्तानात अशा मॉडेल्स फार कमीच पाहायला मिळतात. पण तहमीनाने तिची एक वेगळी ओळख तयार केली आहे. तिने अमेरिकेच्या प्लेबॉय या मॅगझिनसाठी देखील फोटोशूट केलं होतं. 

तहमीना हिने मागील काही दिवसांमध्ये बोल्डनेसच्या सर्व सीमा पार केल्या आहेत. तहमीनाने असे अनेक न्यूड फोटोशूट केले आहेत. तहमीनाचे माता-पिता पाकिस्तानातून अमेरिकेत स्थायिक झाले. तहमीना ही अमेरिकेत वाढली असली तरी ती मुळची पाकिस्तानची असल्याने ती वादाचा विषय बनली.