आमिरची बॉक्स ऑफिसवर 216 करोडोंची 'दंगल'!

बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानच्या सिनेमानं पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर 'दंगल' केलीय. या सिनेमानं प्रदर्शनानंतर आठव्या दिवशीही जोरदार कमाई केलीय. आठ दिवसांत 'दंगल'नं एकूण 216 करोडची कमाई केलीय. 

Updated: Dec 31, 2016, 03:24 PM IST
आमिरची बॉक्स ऑफिसवर 216 करोडोंची 'दंगल'! title=

नवी दिल्ली : बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानच्या सिनेमानं पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर 'दंगल' केलीय. या सिनेमानं प्रदर्शनानंतर आठव्या दिवशीही जोरदार कमाई केलीय. आठ दिवसांत 'दंगल'नं एकूण 216 करोडची कमाई केलीय. 

या सिनेमानं पहिल्या दिवशी 29.78 कोटी, दुसऱ्या दिवशी 34.82 कोटी, तिसऱ्या दिवशी 42.35 कोटी, चौथ्या दिवशी 25.48 कोटी, पाचव्या दिवशी 23.07 कोटी, सहाव्या दिवशी 21.20 कोटी, सातव्या दिवशी 20.29 कोटी आणि आठव्या दिवशी 18.59 कोटींच्या कमाईसोबत या सिनेमानं आत्तापर्यंत 216.12 कोटी जमा केलेत. ट्रेन्ड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवरून ही माहिती दिलीय. 

'दंगल' सिनेमाचं कथानक हरियाणाचे पैलवान महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या मुलींच्या जीवनावर आधारीत आहे. महावीर सिंग समाजाच्या विरुद्ध लढत आपल्या मुलींना... गीता-बबिता यांना... कसे कुस्ती लढण्याचे दावपेच शिकवून त्यांना या खेळातील चॅम्पियन बनवतात, हे या सिनेमातून दाखवण्यात आलंय. या सिनेमाचं चहूकडून कौतुक होताना दिसतंय.