अमेरिकन शटडाऊनचा फटका आता भारताला

अमेरिकन शटडाऊनचा फटका सा-या जगाला बसण्याची चिन्हं आहेत. त्याचा फटका आता भारतालाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या शटडाऊनमुळे भारताचे मिशन मंगळ लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 5, 2013, 01:42 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
अमेरिकन शटडाऊनचा फटका सा-या जगाला बसण्याची चिन्हं आहेत. त्याचा फटका आता भारतालाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या शटडाऊनमुळे भारताचे मिशन मंगळ लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
येत्या २८ ऑक्टोबरला इस्त्रोच्या मार्स ऑर्बिटर मिशनसाठी भारतातर्फे लाँचिंग होणार होतं. त्यासाठी नासाच्या डीप स्पेस नॅव्हीगेशन अँड ट्रॅकिंग सर्व्हीसची निवड करण्यात आली होती. अमेरिकतेली गोल्डस्टोन, स्पेनमधून माद्रीद आणि ऑस्ट्रेलियातून कॅनबेरा इथून इस्त्रोच्या मंगळ मोहीमेला सपोर्ट मिळणार होता. मात्र अमेरिकेतल्या फेडरल शटडाऊनचा फटका भारताच्या मिशन मंगळ मोहीमेला बसण्याची चिन्ह आहेत.
केंद्रीय अर्थखात्याने सुचवलेल्या खर्च कपातीचा फटका डीआरडीओला बसणार आहे. डीआरडीओला संशोधक आणि अंभियंत्यांच्या ४०० जागांसाठी कर्मचारी भरती करायची होती. मात्र खर्च कपातीच्या धोरणामुळे पुढच्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत ही भरती रोखण्यात आलीय. याचा फटका डीआरडीओच्या काही प्रोजेक्ट्सना बसणार आहे.
भारताच्या संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने सध्या अग्नी-६ आणि तेजस हे फायटर विमान हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत. त्यापैकी अग्नी सहा हे इंटर काँटीनेंटर बॉलेस्टीक मिसाईल आहे. तो प्रकल्प रखणार आहे. तर २०१६पर्यंत हवाई दलाच्या ताफ्यात एकूण २० तेजस विमानं दाखल करायची ऑर्डर आहे. मात्र अभियंत्यांच्या कमतरतेमुळे फक्त २ तेजस विमानांची निर्मिती दर वर्षाला होत आहे. त्यामुळे वेळेत हा प्रोजेक्ट पूर्ण होणं आता अशक्य आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ