नवी दिल्ली : 'आप'च्या रॅलीत शेतक-यानं केलेल्या आत्महत्येवरून आता राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसने यानिमित्तानं भाजपवर निशाणा साधला आहे. तर भाजपने मानवतेची हत्या झाल्याचे म्हटले आहे.
केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार उद्योगपतीधार्जीणं असून काँग्रेस शेतक-यांच्या पाठिशी असल्याचं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितलंय. राहुल यांनी रुग्णालयात जाऊन मृत शेतक-याचं अंतिम दर्शन घेऊन त्याच्या इतर सहका-यांची भेट घेतली. तर 'आप' च्या स्टेजवर मानवतेची हत्या झाल्याचा आरोप भाजपनं केला आहे.
At no point must the hardworking farmer think he is alone. We are all together in creating a better tomorrow for the farmers of India.
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2015
Gajendra’s death has saddened the Nation. We are all deeply shattered & disappointed. Condolences to his family.
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2015
केंद्रातील भाजप सरकारच्या वादग्रस्त भूमी अधिग्रहन विधेयकाविरोधात आम आदमी पक्षाने (आप) आज काढलेल्या मोर्चा दरम्यान एक शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केला. त्याचे रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. एका शेतकऱ्यांने झाडाला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. उपचारासाठी राम मनोहर लाल लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ती व्यक्ती राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.