पेट्रोल-डिझेलबरोबर गाड्याही महागल्या!

नव्या वर्षात नवी कोरी कार खरेदी करण्याचा तुमचा बेत असेल, तर ही खरेदी तुमच्या खिशाला चांगलीच चाट लावणार आहे. कारण जवळपास सर्वच लहान मोठ्या कार कंपन्यांनी किंमतीमध्ये वाढ जाहीर केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 1, 2013, 06:01 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
नव्या वर्षात नवी कोरी कार खरेदी करण्याचा तुमचा बेत असेल, तर ही खरेदी तुमच्या खिशाला चांगलीच चाट लावणार आहे. कारण जवळपास सर्वच लहान मोठ्या कार कंपन्यांनी किंमतीमध्ये वाढ जाहीर केलीय.
उत्पादन खर्चात वाढ झाल्यानं किंमती वाढवल्याचं कार उत्पादक कंपन्यांनी सांगितलंय. भारतातली आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीनं त्यांच्या १४ कारच्या मॉडेल्सच्या किंमती २०,००० वाढवल्या आहेत. जनरल मोटर्सनं ३५,००० ते ३०,००० रुपयांनी कारच्या किंमती वाढवल्या आहेत. होंडा कंपनीनं ३५०० पासून ४५,००० पर्यंत किंमती वाढवल्यात. महिंद्रा कंपनीनंही त्यांच्या चारचाकी वाहनांच्या किंमतीत १३,००० ते ३७,००० रुपयांनी वाढ केलीय.

मध्यमवर्गीयांच्या बजेटमधील कारच्या किंमती वाढल्या असतानाच श्रीमंतांच्या कार्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्झरी कारच्या किंमतीतही मोठी वाढ झालीय. ‘ऑडी’ या कारच्या मॉडेलच्य़ा किंमतीत ५९,००० ते ३ लाख ७० हजारापर्यंत वाढ झालीय. तर बीएमडब्लूने २ लाख ४० हजारांनी किंमत वाढवलीय.
जागतिक चलनांत झालेल्या चढ-उतारामुळे उत्पादन खर्चात वाढ झालीचं, कंपन्यांचं म्हणणं आहे पण, दुसरीकडे २०१३ मध्ये जवळजवळ ३० नव्या गाड्यांचे मॉडल बाजारात दाखल होण्याची चिन्हं आहेत.