बहुपत्नीत्व हवंय? तर मग सोडा नोकरीवर पाणी

लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारच्या एका नव्या निर्णयानुसार आता एकापेक्षा अधिक पत्नी असणाऱ्या पुरुषांना प्राथमिक शाळांमध्ये उर्दू शिक्षक होता येणार नाही. 

Updated: Jan 14, 2016, 06:48 PM IST
 बहुपत्नीत्व हवंय? तर मग सोडा नोकरीवर पाणी  title=
लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारच्या एका नव्या निर्णयानुसार आता एकापेक्षा अधिक पत्नी असणाऱ्या पुरुषांना प्राथमिक शाळांमध्ये उर्दू शिक्षक होता येणार नाही. 
या नव्या निर्णयानुसार एखाद्या स्त्रीच्या पतीसही अजून एक पत्नी असल्यास त्यांना या पदांसाठी अर्ज भरता येणे अशक्य होणार आहे. 


उत्तर प्रदेश सरकारने नुकतीच प्राथमिक शाळांमध्ये ३५०० उर्दू शिक्षकांच्या भरतीची सूचना काढली आहे. त्यासंदर्भात हा निर्णय महत्त्वाचा ठरतो. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने मात्र यावर नाराजी नोंदवली आहे.

सरकारच्या मते मात्र शिक्षकाच्या निधनानंतर त्याला मिळणारे पेन्शन त्याच्या कोणत्या जोडीदाराला द्यावे यावरुन होणारे वाद टाळण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. आता पदासाठी अर्ज करताना आपली वैवाहिक माहिती देणे उमेदवारांना अनिवार्य असणार आहे. 

पण हा वाद टाळण्यासाठी सरकार पेन्शनचे दोन साथीदारांमध्ये अर्धे वाटप करू शकते; हा निर्णय म्हणजे मुसलमानांच्या हक्कांचे उल्लंघन आहे, असे काही मुस्लिम संघटनांचे म्हणणे आहे.