नवी दिल्ली: ड्रग्स किंवा अमली पदार्थांचं सेवन करणं हे स्टाईल स्टेटमेंट नाही ते फक्त विनाशाचं कारण ठरतं, त्यामुळं त्याच्या विळख्यातून बाहेर पडा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील तरूणांना केलं. आकाशवाणीवरील 'मन की बात' या कार्यक्रमातून त्यांनी देशवासियांशी संवाद सादत अमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावलं.
अमली पदार्थांचे थ्रीडी परिणाम होतात- डार्कनेस, डिस्ट्रक्शन आणि डिव्हास्टेशन. जेव्हा एखादा तरूण किंवा तरूणी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकतात तेव्हा फक्त ते नव्हे तर त्यांचं संपूर्ण कुटुंब पर्यायानं देश उध्वस्त होतो.
जे तरूण ड्रग्स घेतात, त्यांनी विचार केला पाहिजे की तुम्ही नशेसाठी हा जो पैसा खर्च करता, तो कुठे जातो? अमली पदार्थांच्या विक्रीतील पैसे हे दहशतवाद्यांच्या हातात जातात आणि त्यांच्या कारवायांना आणखी बळ मिळतं.
त्यातूनच ते शस्त्र खरेदी करतात आणि आपल्या देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांवर, देशातील तरूणांवर गोळ्या झाडतात. ही चिंताजनक बाब आहे, असं मोदी म्हणाले.
ज्यांच्यासमोर एखादं ध्येय असेल त्यांना अशी व्यसनं लागत नाही, त्यामुळं आपल्या मुलांना ड्रग्सच्या विळख्यातून वाचवायचं असेल तर त्यांना ध्येयवान बनवा, असं आवाहन मोदींनी पालकांना केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.