`योगगुरू बाबा रामदेव यांचं तेच होईल, जे आसाराम बापू यांचं झालं`

`योगगुरू बाबा रामदेव यांचं तेच होईल, जे आसाराम बापू यांचं झालं`, असं भाकीत, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी केले आहे. रामदेव हे त्याच रस्त्यावर आहेत, ज्या रस्त्यावर आसाराम यांचा प्रवास सुरू होता.

Updated: Jan 16, 2014, 06:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`योगगुरू बाबा रामदेव यांचं तेच होईल` जे आसाराम बापू यांचं झालं असं भाकीत, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी केले आहे. रामदेव हे त्याच रस्त्यावर आहेत, ज्या रस्त्यावर आसाराम यांचा प्रवास सुरू होता.
साधू संताच्या वेशात बाबा रामदेव राजकारणात रस घेत असल्याचा आरोपही यावेळी लालू प्रसाद यादव यांनी बाबा रामदेव यांच्यावर केला.
साधू संतांचा वेश धारण करून रामदेव बाबा `बक बक` करत असतो, आणि तो आजकाल नरेंद्र मोदींचा गुरू बनून फिरतोय, म्हणून आता साधू आणि नकली साधू यांच्यातील खरा फरक ओळखण्याची गरज आहे.
पंतजली योगपीठकडून विकल्या जाणाऱ्या वस्तूंची प्रत चांगली नसल्याचंही लालू यादव यांनी म्हटलं आहे.
लालू प्रसाद यादव यांनी नरेंद्र मोदी यांचं समर्थन केलेलं नाही, मात्र राहुल गांधी हेच पंतप्रधानपदासाठी योग्य आहेत, असं उघड समर्थन लालू प्रसाद यादव यांनी केलं आहे.
दुसरीकडे लालू यादव हे श्री कृष्ण नाहीत, तर कंस मामा असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलं होतं, यावर लालू प्रसाद यादव यांनी बाबा रामदेव यांच्यावर हे तोंडसूख घेतलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.