अहमदाबाद : शहरातील सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयसीयूच्या रूग्णांचा छळ होतोय, कारण आयसीयूत गरबा खेळण्यात आला, आयसीयू असं सजवण्यात आलं की जणू काही तिथे वाढदिवसच आहे. हे सर्व आरोग्य मंत्री हॉस्पिटलच्या दौऱ्यावर असल्यामुळे करण्यात आलं.
आयसीयूत मोठ्या आवाजातही बोललं जात नाही, जेथे रूग्ण जीवन-मृत्यूची लढाई लढत असतात, अशा ठिकाणी स्पिकर्स लावून गरबा खेळण्यात आला, यात हॉस्पिटलचे डॉक्टर, नर्स, रूग्ण सहभागी झाले होते.
रूग्णांशी असं वागणं, कुणालाही आवडणार नाही असं ते चित्र आहे, स्पिकर्सच्या आवाजात गरबांसाठी कर्मचारी डॉक्टर गोल-गोल फिरतांना रूग्ण मात्र त्यांच्याकडे केविलवाण्या अवस्थेने पाहत होते.
गुजरातचे आरोग्य मंत्री नितिन पटेल हॉस्पिटलमधील डायलेसिस युनिटच्या उद्घाटनासाठी आले होते, त्या उत्साहात हॉस्पिटलने हा गरबा डान्स केल्याचं सांगण्यात येतंय.
आरोग्य मंत्री नितिन पटेल यांनी उद्घाटन केल्यानंतर, मंत्री निघून गेल्यानंतर हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे, यावर मंत्र्यांनी हॉस्पिटलकडून रिपोर्ट मागवला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.