ताजमहालासमोरच युगुलाचा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न

प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताजमहालासमोरच एका प्रेमी जोडप्यानं गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. 

Updated: Jul 16, 2015, 05:23 PM IST
ताजमहालासमोरच युगुलाचा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न title=

आगरा : प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताजमहालासमोरच एका प्रेमी जोडप्यानं गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. 

गेल्या मंगळवारी ही घटना घडलीय. इथं फिरायला आलेल्या एका प्रेमी जोडप्यानं एकमेकांच्या हातात हात घालूनच आपलं आयुष्य संपवायचा निर्णय घेतला. देहरादूनचा रहिवासी असलेला मुलगा आणि आगऱ्याची रहिवासी असलेल्या मुलीनं हे धक्कादायक कृत्य केलंय. 

संबंधित मुलगा आणि मुलगी एकमेकांवर खूप प्रेम करतात. पण, धर्म वेगवेगळा असल्यानं त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या या प्रेमाला नाकारलं. दोघांनीही आपल्या कुटुंबीयांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण व्यर्थ... 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी ताजमहालसमोरच्या पार्कात खूप वेळ गप्पा मारल्या... आणि त्यानंतर ब्लेडनं आपल्या गळ्यावर वार करून दोघांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला. 

या घटनेमुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. पोलिसांच्या मदतीनं दोघांनाही हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आलं. दोघांवरही उपचार सुरू आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.