नवी दिल्ली : बाल गुन्हेगारी कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. बाल गुन्हेगारीचे वय आता १६ वर्षे करण्यात आले.
बहुचर्चित बालहक्क कायद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दिली. त्यामुळे बाल गु्न्हेगारी ही सुधारणा केली आहे. गंभीर गुन्ह्यांसाठी कायद्यांतर्गत १६ ते १८ वयोगटातील तरूणाचा समावेश करण्यात आला आहे.
आता १६ वर्षांचा आरोपी सज्ञान ठरणार आहे.. दिल्लीच्या सामूहिक बलात्कारानंतर यावर झाली होती चर्चा. एखाद्या गुन्हयात अडकल्यानंतर १८ वर्ष पूर्ण केले नसल्याने आरोपी सज्ञान नसल्याचे कारण देत बालसुधारगृहामध्ये रवानगी होत होती. आता नव्या बदलामुळे १६ वर्षांच्या आरोपींना आता जेलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
१६ ते १८ वय असलेल्या व गुन्हयात अडकलेल्या आरोपीविरुध्द भादंवी कायद्यांतर्गत खटला चालू देण्याच्या बालहक्क कायद्याच्या प्रस्तावाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी प्रसारमाध्यामांना दिली.
संसदीय समितीच्या शिफारसी मंजुर करतानाच हा मंजूर करण्यात आलेला प्रस्ताव पुढे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन कायद्यामुळे १६ ते १८ वर्षीय युवकांना आता बालसुधारगृहात पाठविण्याऐवजी त्यांच्याविरोधात भारतीय दंड विधान अंतर्गत न्यायालयीन खटला लढून त्यांना प्रौढ व्यक्तीप्रमोण शिक्षेस सामोरे जावे लागेल.
दरम्यान, हत्या, बलात्कार आणि दरोडा यासारख्या गुन्हयांमध्ये अडकलेल्या अल्पवयीन आरोपीविरुध्द असलेल्या कायद्यात सुधारणा करणे गरजेचे आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.