www.24tass.com, झी मीडिया, कोलकाता
इंग्लंडचा राजकुमार जॉर्जच्या जन्माची घोषणा करण्यात मदत करणारा शाही कुटुंबातला सेवक बदर अजीम हा रमजानचा महिना संपल्यावर पुन्हा लंडनला जावू शकतो. शिवाय अजीम भारतात सुद्धा काम करु शकतो, असा संकेत त्याच्या काकांनी गुरूवारी दिला.
इंग्लंडमध्ये शिकत असलेला मुळचा कोलकातातील असलेला २५ वर्षीय मोहम्मद शमीम हा बदर अजीम याचा काका आहे. त्याच्या मते बदर अजीम यानं भारतात चांगला पर्याय मिळाल्यास तो स्विकारावा. दिल्लीत राष्ट्रपती भवनातील नोकरीसाठी बदर अजीम प्रयत्नशील आहे का? या प्रश्नाचं उत्तर देणं त्याच्या काकानं टाळलं.
शमीम यानं दिलेल्या माहितीनुसार बदरचा वीजा संपलाय आणि चार दिवसांपासून तो शहरातच आहे. बदर हा लंडनला शिक्षणासोबतच नोकरी करत होता. सेवा क्षेत्रातील डिग्री घेतलेल्या अजीमनं बकिंघम पॅलेसबाहेर राजकुमाराच्या जन्माची घोषणा करण्यात मदत केली होती. त्याचे वेल्डर काम करणारे वडील मोहम्मद रहीम (५२ वर्ष) आणि आई मुमताज बेगम (४१ वर्ष) हे दोघं आजही कोलकाता इथल्या झोपडपट्टीत बेनियापुकुर इथं राहतात, जिथं अजीमचं लहानपण गेलं.
कुटुंबाच्या जवळचे मित्र असलेले मोहम्मद रब्बानी यांनी सांगितलं कि रमजाननंतर अजीम लंडनला जाईल, इथं थांबणार नाही. लंडनमधील शाही परिवारातली नोकरी सोडून तो भारतात कशाला थांबेल, असंही रब्बानी म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.