शिवसैनिकाने मारहाण केल्याचे ओवेसींनी फेटाळले...

 एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना संसदेच्या परिसरास मारहाणीचा शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचा कार्यकर्ता गोरख खर्जुल यांनी केलेला दावा ओवेसी यांनी फेटाळून लावला आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 23, 2017, 05:23 PM IST
शिवसैनिकाने मारहाण केल्याचे ओवेसींनी फेटाळले...  title=

नवी दिल्ली :  एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना संसदेच्या परिसरास मारहाणीचा शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचा कार्यकर्ता गोरख खर्जुल यांनी केलेला दावा ओवेसी यांनी फेटाळून लावला आहे. 

सवंग प्रसिद्धीसाठी असा दावा करण्यात आला असल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे.  

नेमका काय प्रकार घडला...

गोरख गोपाळ खर्जुल या नाशिकच्या एका नागरिकाने एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन औवेसी यांच्यावर हल्ला केल्याचं बोललं जातंय. ते नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचा समर्थक असल्याचा दावा गोरख यांनी केला आहे. 

उलट उत्तर दिल्याने खासदार असद्दुदीन ओवैसींच्या कानाखाली वाजवली असल्याचं गोरख यांचं म्हणणं आहे. दुपारी १ ते २ च्या दरम्यान हा प्रकार संसदेच्या परिसरात घडला असल्याचं गोरख यांनी सांगितलं.

दिल्लीत संसद भवन बघायला खुर्जुल गेला होता. त्यावेळी त्यांना समोरुन येणारे एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी दिसले.

खर्जुल यांनी ओवेसींची भेट घेऊन तुम्ही वादग्रस्त वक्तव्य का करता, असं विचारलं, त्यावेळी ओवेसींनी बाचाबाची केली, असा दावा खर्जुल यांनी केला.

संसदेचं कामकाज पाहायला आलो होतो. पार्किंगमध्ये गाडीची वाट पाहत होतो. त्यावेळी ओवेसी दिसले. ते वादग्रस्त विधान का करतात असं विचारलं. यावर त्यांनी उलटसुलट उत्तर दिलं. त्यामुळे मी त्यांना कानफाडत लगावली. या घटनेचा मला पश्चात्ताप नाही. कोणत्याही कारवाईला सामोरं जायला तयार आहे, असं गोरख खर्जुल यांनी सांगितलं.

हा प्रकार संसद भवनातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचा दावाही खर्जुल याने केला आहे.  माझ्याकडून असा प्रकार घडला असल्याची कबुली खर्जुल याने प्रसारमाध्यमांना फोन करून दिली. एक हिंदुत्ववादी रक्त माझ्यामध्ये सळसळतय त्यामुळे मी हा प्रकार केल्याचा दावा त्याने केला आहे. मी जे काही केले आहे ते काही चूक केले नाही. मी ओवेसींना मारले तर महाराष्ट्रातील जनतेला आनंदच झाला असेल असा दावाही त्याने केला आहे.