सर्व रेल्वे गाड्यांना लागणार दोन सामान्य डबे

भारतीय रेल्वेने सर्व मेल-एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट गाड्याना अतिरिक्त दोन सामान्य डबे (जनरल कोच) लावण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरूवात अधिक गर्दी असलेल्या देशातील प्रमुख रेल्वे मार्गांपासून होणार आहे. 

Updated: May 25, 2015, 04:56 PM IST
सर्व रेल्वे गाड्यांना लागणार दोन सामान्य डबे  title=

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने सर्व मेल-एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट गाड्याना अतिरिक्त दोन सामान्य डबे (जनरल कोच) लावण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरूवात अधिक गर्दी असलेल्या देशातील प्रमुख रेल्वे मार्गांपासून होणार आहे. 

रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी रेल्वे बजेटमध्ये प्रवासी गाड्यांमध्ये अतिरिक्त स्लीपर क्लास डबे जोडण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मेल, एक्स्प्रेस, सुपरफास्ट, दुरांतो, शताब्दी, गाड्यांना आता २६ डबे लावण्याची योजना आहे. 

रेल्वे मंत्रालयाने आता प्रवासी गाड्यांमध्ये दोन सामान्य डबे लावणे अनिवार्य केले आहे.  याची बजेटमध्ये चर्चा झाली नाही. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाने दररोज जनरल डब्याने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.