मुंबई : अळूची पानं ही आरोग्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची आहेत. याचे शरिराला अनेक फायदे होतात. जाणून घ्या काय आहेत अळूच्या पानाचे फायदे.
१. अळू थंड असल्याने ते वात, पित्त, कफ नाशक असतात.
२. अशक्तपणा दूर करण्यासाठी अळूची पाने ही प्रभावकारी ठरतात.
३. दूध कमी येत असल्यास बाळंत्तिणी महिलेने अळूच्या पानांची भाजी खावी.
४. तापामुळे जीभेची चव जाते. त्यामुळे कोणतंच अन्न चवीष्ट लागत नाही. पण अळूच्या पानामुळे चव परत येते.
५. अळूची पाने शरिरात रक्त वाढवण्यास मदत करतात.